'नामंका'च्या पाण्याने सुखावला लाभक्षेत्रातील शेतकरी

बाळासाहेब लोणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नाशिक जिल्ह्यात हक्काच्या धरणावर मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असून हक्काच्या पाण्यासाठी दुष्काळी गंगापूर-वैजापूर दोन्ही तालुक्याला वंचित ठेवले जात आहेत. दोन्ही तालुक्याच्या पाण्याचा वाटा इतर वरील भागासाठी ओरबाडून घेतला जात आहे. हा अन्याय थांबविण्यासाठी आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार आहे.

-  विश्वजित चव्हाण (माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस)

गंगापूर : नांदूर मधमेश्वरचे पाण्याने लाभक्षेत्रातील
शेतकरी सुखावला असून पावसाने ओढ दिलेल्या खरीप हंगामाला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अडीच महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून तालुक्यात
भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

पेरणीयोग्य पाऊस नसल्याने दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकर्याला नामंका पाण्याने दिला असून, शेततळे भरू घेण्यावर शेतकरी भर देत आहेत. या पाण्यामुळे तालुक्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याने दिलासा दिला असे म्हणण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण जून. जुलै व ऑगस्टचा पहिला आठवडा कोरडाच गेला.  नांमका पाणीआवर्तनाने तालुक्यातील सर्वच बंधारे भरून घेण्यात येणार असल्याने पाणीयोजनेला संजीवनी मिळणार आहे. शेतशिवारात पाणी फिरल्याने विहिरीलाही पाणी उतरणार आहे. पाणीटंचाईची झळ व चांगलेच चटके शोषिक गंगापूरकरांना बसल्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यावर भर असणार आहे.

पाणी योजनेची गरज

तालुक्याच्या एकीकडे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे तर नामंका आवर्तनाने काही गावांना दिलासा मिळाला आहे, मात्र, मालुंजा गावापासून खालची सर्वच गावे तहानली आहेत. गोदावरी नदीपासून मालुंजा लासूर स्टेशन अशी पाणी योजना मंजूर करून शिल्लेगाव धरणात सोडल्यास शेकडो गावे
ओलिताखाली येतील.

नाशिकच्या पाण्याचा आधार

नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील धरणांच्या भागात धो-धो पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील धरणे ७५ टक्के भरली आहेत. धरणे भरल्यानंतर धरणांतून विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरण (७६), दारणा (७२), पालखेड (७४) इतका पाणीसाठा आहे.

Web Title: Farmers are satisfied with their scheme water