झेंडूच्या शेतीने फुलविले दिवाळीप्रसंगी शेतकऱ्य़ाच्या चेहऱ्यावर हास्य!

VIVEK.jpg
VIVEK.jpg

जळकोट (जि.लातूर) : उमरगा रेतु (ता. जळकोट) येथील प्रगतीशील शेतकरी अमृत व्यंकटराव केंद्रे यांनी खूप मोठ्या कष्टाने माळरानावर पेरु व मोसंबी बागेत घेतलेल्या झेंडू फुलाने अडीच लाख रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. ऐन दिवाळीत आर्थिक आधार दिला आहे. या फुलशेतीने शेतकऱयाच्या चेहऱ्यावर हास्य व प्रसन्नता निर्माण झाली आहे. 

गतवर्षी यांनी लागवड केलेल्या झेंडू शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी मात्र झेंडू फुलांनी चांगला भाव मिळाल्याने चेहऱ्यावर हसू फुलवले असून आर्थिक आधार मिळाला आहे. कोरोना संकटातून बाहेर पडताना दिवाळी सणासाठी नागरिकांत उत्साह असल्याचे चित्र आहे.

 एकीकडे कोरोनाचे संकट असताना अडचणीत सापडलेला शेतकरी भाजीपाला व फळबागेचे नुकसान सहन करावे लागले. परंतु येणाऱ्या सण-उत्सवाला फुलाला चांगली मागणी मिळून चार पैसे हाती येतील या आशेने झेंडू फुलशेती केली. त्यांनी दोन एकर पेरु व मोसंबीत आंतरपीक म्हणून मोकळ्या जागेत झेंडुची लागवड केली. शिरुर ते मुखॆड महामार्गालगत त्यांची शेती असून शेततळे, विहिरीच्या पाण्याचा उपयोग करुन गेल्या काही वर्षापासून या भागात फुलशेतीचा यशस्वी प्रयोग करत आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या फुलांना मागणी असते. 

टाळेबंदीत त्यांची बहरवलेला भाजीपाला, पपई आदीचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या विविध नव्या प्रयोगातून परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते. या झेंडू फुलांचे सुरवातीला दसरा सणाला तीस हजार रुपये हाती आले. त्यानंतर दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी मोठी मागणी लक्षात घेऊन फुल व्यापारी स्वतः शेतात येऊन दहा ते साडे दहा हजार रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे फुले विकली. एकुण २४ क्विंटल फुले विक्री झाली. यातून व पूर्वीचे मिळून अडीच लाख रुपये तर आता राहिलेला उर्वरित बहार तीस हजार रुपयास विक्री केला आहे. असे श्री केंद्रे यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितले. महामार्गालगत स्टॉल लावून थेट विक्रीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.


दोन एकरामध्ये पेरु (जांब) व मोसंबीची फळबाग असून यात झेंडू फुलाचे आंतरपीक म्हणून घेतले. यात तीस गुंठेच रान मिळाले असेल. यातून अडीच लाख रुपये हाती आले. त्यामुळे उत्साह वाढला असून यापुढेही फुलशेतीचे नियोजन करणार आहे. गतवर्षी फुलशेतीत नुकसान झाले. टाळेबंदीत मोठे नुकसान झाले पण निराश न होता शेतीत कष्ट केले तर काळी आई उपाशी ठेवत नाही असा अनुभव आहे - अमृत केंद्रे (शेतकरी)

(संपादन- प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com