शेतकरी आत्महत्या सुरूच, उपाय योजना तोकड्या

Farmers committed Suicide in Beed
Farmers committed Suicide in Beed

बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना तोकड्या पडत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत 125 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, हमी भावाने विकलेल्या मालाचे चुकारे नाहीत, पाऊस नसल्याने पिके वाळत आहेत, कपाशी आणि ऊस विविध रोगराईने खाल्ला आहे. आशा अनेक नैसर्गिक संकटात शेतकरी अडकला आहे. त्यातच बँकांकडून पीक कर्जासाठी अडवणूक होत आहे. या आणि अशा अनेक कारणांनी शेतकरी मृत्यूला जवळ करत आहे.

जिल्ह्यात जानेवारी पासून आजपर्यंतच्या आठ महिन्यात तब्बल 125 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील 95 शेतकरी आत्महत्या प्रकरणे शासन मदतीस पात्र ठरली आहेत. तर, सात प्रकरणे अपात्र ठरली आहेत. उर्वरित प्रकरणे तहसील पातळीवर आहेत. सर्वाधिक 25 शेतकरी आत्महत्या गेवराई तालुक्यात आहेत. तर, सर्वात कमी दोन शेतकरी आत्महत्या वडवणी तालुक्यात आहेत. 

हमी ना पिकण्याची, विकण्याची, ना पैसे भेटण्याची

कधी दुष्काळ तर कधी रोगराई यामुळे शेती उत्पन्नाची हमी नाही. त्यात उत्पादन झालेला शेतीमाल विकायचा कुठे याची हमी नाही. हमीभाव केंद्र उशिरा सुरू होतात. पुन्हा बरडण्याचा तुटवड्यामुळे बंद असतात आशा कारणांनी सर्व शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होत नाही. शासनाने खरेदी केलेल्या मालाचे ओऐसे भेटण्याचीही हमी नाही. मागच्या वर्षी खरेदी केलेल्या मालाचे अद्याप चुकारे भेटले नाहीत.

कापूस, ऊसावर रोगराई

शासन कापसाचे चांगल्या प्रतीचे बियाणे यंदाही उपलब्ध करून देऊ शकले नाही. बोंड अळीने कापसाचे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. मधल्या काळात दीड महिना ओवसाने उघडीप दिल्याने इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने संशोधन केलेलं आणि कारखान्यांनी शेतकऱ्यांना पुरविलेल्या बियानांच्या ऊसावरही हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

प्रेरणा प्रकल्प : समुपदेशन पण औषधींचा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालयांत प्रेरणा प्रकल्प सुरू करून मानसोपचार तज्ज्ञांसह समुपदेशक नेमले आहेत. मात्र, मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी आवश्यक औषधींचा सर्वत्र तुटवडा असतो. 

तालुकानिहाय आत्महत्या

- गेवराई : 25
- बीड: 16
- शिरूर : 11
- पाटोदा : 19
- आष्टी : 09
- माजलगाव :13
- धारूर : 13
- वडवणी : 02
अंबाजोगाई : 06
- केज : 15 
-  परळी : 04 
एकूण : 125

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com