येडूद येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

येडूद येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली : जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ पाहणी दौरा सुरु असतांनाच दुसरीकडे येडूद (ता.औंढा नागनाथ) येथे तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.20) घडली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील येडूद येथील शेतकरी दामोदर लक्ष्मणराव घुगे (वय 42) यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यामधे दोन एकर शेती घुगे यांच्या नावे तर तीन एकर शेती श्रीमती घुगे यांच्या नावे आहे. या शेतीवर त्यांनी युनीयन बँकेकडून 80 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या शिवाय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचेही त्यांच्यावर कर्ज होते. घरी पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून असलेल्या दुष्काळामुळे पिके हाती आली नाहीत. यावर्षीही पावसाच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतामधून सोयाबिन आलेच नाही तसेच कापसालाही फटका बसला आहे. शेतीत पिकच आले नसल्याने पिककर्ज कसे भरावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी शनिवारी (ता.20) पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून दुष्काळ पाहणी दौरा सुरु आहे. लोकप्रतिनिधी दुष्काळी भागाची पाहणी करीत असून या दौऱ्यातच झालेली शेतकरी आत्महत्या दुष्काळी परिस्थितीची तिव्रता दाखवून देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com