शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार

तानाजी जाधवर
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

उस्मानाबाद : केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत चांगले बदल केले असून आता पिक विमा कंपन्यांना अंतिम मुदतीच्या दोन महिन्याच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे द्यावेच लागणार आहेत. मुदतीच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपन्यांना विम्याच्या रक्कमेवर 12 टक्के व्याज देण्याची तरतुद करण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीला विम्याचे पैसे मिळण्यास दिड दोन वर्षाचा कालवाधी लावला जातो. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.   

गेल्या काही वर्षापासुन पिक विम्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. विमा कंपनी व राज्य सरकार या दोन्हीच्या संयुक्त वाट्याने विमा रक्कम दिली जाते. राज्य सरकार आपली रक्कम देण्यास उशीर करत असल्यानेही या प्रक्रियेला विलंब होत होता. आता मात्र मुदतीच्या तीन महिन्याच्या आत न देणाऱ्या राज्य सरकारलाही 12 टक्के व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. येत्या एक ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी कऱण्यात येणार आहे. नव्या बदलात हंमागी फळबाग योजनेचाही प्रायोगिक तत्वावर समावेश करण्यात आला आहे. शिवाय रान रान डुक्कर किंवा तत्सम जंगली प्राण्यांकडुन झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळणार आहे.

नुकसान भरपाई विमा योजनेत याचाही समावेश झाल्याने या निर्णयाबाबत संभ्रम असला तरी त्याचे निकष लागुन झाल्यानंतर हा संभ्रम दुर होणार आहे. मराठवाड्यामध्ये सध्या पावसांच्या कमतरतेमुळे दुष्काळाचे सावट हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेले आहे. त्यामुळे किमान या नवीन बदलाचा चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजुला प्रशासनाकडुन पंचनामे करण्यासाठी होणारी दिरंगाई यामुळे कमी होईल व लवकर पंचनामे करुन नुकसानीची तीव्रता कंपन्याना दिली तर नक्कीच लवकर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

Web Title: farmers got their crop insurance money