शेतकऱ्यांनो...शेतीपूरक उद्योगाची कास धरा

File photo
File photo

नांदेड : तीन ते चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकटे येत आहेत. त्यातून त्यांना बाहेर पडणे आता अशक्‍य झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही मिळू शकलेली नाही. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपविण्याचा एकमेव पर्याय निवडला असून, अनेकांनी जीवनही संपविलेले आहे. मात्र, आत्महत्या हाच एकमेव पर्याय नसून, शेतीपूरक उद्योगाची कास धरल्यास त्यातून निश्‍चितच बाहेर पडता येऊ शकते, असा सल्ला निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठलराव कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला आहे.


त्यांनी सांगितले की, भारतात ८० ते ८५ टक्के उत्पन्न हे शेती आणि शेतीविषयक उद्योगातून येते. शेतीला पूरक असे अन्न प्रक्रिया, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय असे अनेक प्रकारचे उद्योग चालू असतात. शेळी ही गरीबाची गाय मानली जाते. कारण तिलाराहण्यासाठी कमी जागा लागते. तिचा खुराक कमी असतो. शेळीचे दूध आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरते. मत्स्य शेतीचा कृषी उद्योगांमध्ये महत्त्व फार आहे. ओली मासळी आणि सुकी मासळी असे दोन प्रकार असतात. त्याचा हॉटेल उद्योगासाठी मोठी मागणी आहे. अशा प्रकारे शेती हा कृषी विषयक उद्योगांचा पाया आहे. भारतीय औद्योगिक विकासाला हातभार कृषी विषयक उद्योगातून मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्यांकडे न जाता शेतीपूरक उद्योगाची कास धरणे योग्य ठरेल असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. 
 
शेळी पालन सर्वात सोपे
 
ग्रामीण भागात अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी संकरित गायी पाळणे, कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. शेळीपालन हा त्यापैकी एक अत्यंत फायदेशीर पूरक व्यवसाय आहे. थोड्या श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसायआहे. विशेष म्हणजे कुठल्याही हवामानात शेळी जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरड्या हवामानात शेळीची वाढ चांगली होती. शेळीच्या आहात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होते. शेळीसाठी जागाही कमी लागले. भांडवल कमी लागते. शेळीचा गर्भ्रकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्‍या कालावधीचा असतो व भाकडकाळ कमी असतो. शेळीचे दूध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपय्कुत असे असते. शेळीच्यालेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून मोठी किंमत आहे.
 
शेळ्यांचे व्यवस्थापन
 
शेळ्यांना मोठ्या गोठ्यांची आवश्‍यकता नसते. उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत चार फूट उंचीची भिंत व त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम आहे. बंदिस्त जागा प्रत्येकी १२ चौरस फूट व मोकळी जागा प्रत्येकी २५ चौरस फूट असावी. खाद्याचे प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा तीन-चार किलो, वाळलेला चारा एक किलो याप्रमाणे द्यावा.
 
रेशीम शेतीही फायद्याची
 
रेशीम हा शेतीस पूरक व्यवसाय असून तो अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकऱ्यांस कमीत कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात तीन एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर ते झाड साधारणतः पंधरा वर्षांपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांशिवाय यात दरमहा चांगले उत्पन्न मिळविता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com