ऊस पेटविण्याच्या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाला निमंत्रण

ऊस पेटविण्याच्या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाला निमंत्रण

उस्मानाबाद : कारखानदार व ऊस तोडणाऱ्याच्या वाढत चाललेल्या अन्यायामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असुन सांजा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांनी फडातील ऊस पेटवुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस पेटविण्याचा कार्यक्रमास उपस्थित रहावे असे निमंत्रण त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर सांभाळलेला ऊस पेटवुन देण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे चित्र आता जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आहे. कारखानदारांनी तर शेतकऱ्यांवर अन्याय केलाच आहे, पण दुसऱ्या बाजुला टोळीचालकांच्या मुजोर कारभाराला कोणाचाही लगाम नसल्याचे वास्तव आहे. एका बाजुला ऊस वाळुन जात असुन दुसऱ्या बाजुला कारखानदार ऊस घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. ऊस न्यायचा झाला तर टोळीचालकाकडुन मोठ्या प्रमाणात अडवणुक करण्यात येत आहे, पहिल्यांदा सहा हजार रुपये त्यानंतर प्रत्येक खेपेला पाचशे रुपये अशा प्रकारच्या मागण्या होताना दिसत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी ऊस जाणार नाही, या भितीने अशा मागण्या पुर्ण देखील केल्याने अशा टोळीचालकांची मुजोरी वाढत असल्याचे चित्र आहे. सभासदांच्या तारखा येऊनही बिगर सभासदाचा ऊस स्विकारण्याचे काम कारखानदार करत आहेत. या शिवाय कारखान्यानी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केल्याचे दिसत नाही. एफआरपीच्या रक्कमेच्या 80 टक्के रक्कम हातावर टेकविली जात असुन दुसऱ्या हप्त्याबद्दल कोणताच शब्द दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. दुष्काळाची परिस्थिती भिषण झाल्याने यापुढे ऊस टिकणे अवगड आहे, तेवढ्यातुनही वाळलेल्या ऊसाचे उत्पादन कमी होत असल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अजूनही ऊस नेला जात नसल्याने शेतकरी हताश होऊन शेवटी ऊसाचे फड पेटविण्याची भाषा करताना दिसत आहे.

कारखानदार व टोळीचालकाच्या मनमानी कारभाराला वैतागुन गावातील आम्ही काही लोकांनी ऊसाचा फड पेटवुन देण्याचा निर्णय घेतला आहे, गूरुवारी (ता. 24 ) दुपारी एक वाजता ऊस पेटवुन देणार असुन जिल्हा प्रशासनासह कारखानदारानी यावेळी उपस्थित राहण्यासाठी त्याना पत्र दिले आहेत.
- नामदेव आण्णासाहेब नायकल, शेतकरी, (सांजा. ता.उस्मानाबाद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com