शेतकऱ्यास जीवंत जाळण्याचा डाव फसला

शेतकऱ्यास जीवंत जाळण्याचा डाव फसला

नांदेड : शेतीच्या वादातून एका वृद्धास जीवंत जाळण्याचा प्रयत्न लोहा तालुक्यातील पाताळगंगा येथे रविवार (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी तिन जणांविरुद्ध माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाताळगंगा (ता. लोहा) येथील शेतकरी गोविंद नागोराव चिरले (वय ६०) हे आपल्या शेतातील झोपडीत झोपले होते. त्यावेळी शेतीच्या वादातून गणेश चिरले, निळोबा चिरले आणि नारायण चिरले या तिघांनी झोपडीला रात्री साडेअकरा वाजता आग लावली. आग लागल्याचे दिसताच शेतातील सालगडी आणि इतर शेजारी यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

गोविंद चिरले हे काही प्रमाणात भाजले

या आगीत गोविंद चिरले हे काही प्रमाणात भाजले असून त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत गोविंद चिरले यांचे झोपडीतील पाच हजार रुपयाचे शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. गोविंद चिरले यांच्या तक्रारीवरुन गणेश नारायण चिरले, नारायण नागोराव चिरले आणि निळोबा नारायण चिरले यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्रोबा घाटे करत आहेत.

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना कोरका पिंपळगाव (ता. नांदेड) येथे रविवारी (ता. २३) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
 
कोरका पिंपळगाव (ता. नांदेड) येथील शेतकरी विठ्ठल एकनाथ कोरके (वय ४२) यांच्या शेतात मागील काही दिवसांपासून सतत नापिकी होत होती. यातून त्यांनी घरखर्च चालविण्यासाठी बँकेचे कर्ज काढले. मात्र शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यातच मुलीचे लग्न आल्याने ते कसे करायचे या विवंचनेत त्याने आपल्या राहत्या घरी शनिवारी (ता. २२) ते रविवारी (ता. २३) या दरम्यान विठ्ठल कोरके याने वीष पीऊन आत्महत्या केली. ही माहिती भगवान नामदेव कोरके यांनी लिंबगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास फौजदार गणेश गोटके करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com