सातबाऱ्यासाठी शेतकऱ्यांचे ध्वज स्तंभावर बसून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

जरंडी :  सोयगावसह तालुकाभर महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतीचे उतारे मिळत नाहीत. चकरा मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सातबारे मिळण्यासाठी शासनाचा व सर्वर कंपनीचा निषेध करत बुधवारी ध्वज स्तंभावर बसून तासभर अभिनव आंदोलन केले. या ऑनलाईन आणि डिजिटल सातबाऱ्याच्या जाचातून मुक्त करून स्वातंत्र्य देण्याची नवीन मागणीही केली. वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या या अभिनव आंदोलनाची जिल्हाभर चर्चा रंगू लागली होती.

सर्वर बंद अभावी तालुक्यात महिनाभारापासून शेतीचे उतारे मिळत नाही. सध्या शेतकऱ्यांना बँकेचे पीककर्ज, पीकविमा, भरण्यासाठी बँकांनी सातबारे आवश्यक केले आहे. खरीपाचा पीकविमा भरण्याची अंतिम मुदतीची ता. 24 आहे. परंतु त्याआधी लागणारी जाचक कागदपत्रांची जुळवणूक आणि बँकांचा ससेमिरा यामुळे पीकविमा भरण्यासाठी जुळवाजुळवमध्ये सातबारा आवश्यक असल्याने तोच मिळत नाही. 

सोयगाव तालुक्यातील शेतकरी दररोज तहसील कार्यालयाला चकरा मारून कंटाळले होते. त्यामुळे बुधवारी अखेरीस वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ध्वज स्तंभावर बसून अभिनव आंदोलन करत शासनाचा व सर्वर कंपनीचा निषेध केला. आगामी स्वातंत्र्य दिनाच्या आधी या डिजिटल सातबारे व ऑनलाईनच्या जाचातून स्वातंत्र्य देण्याची सूचक मागणी निवेदनाद्वारे केली. या नवीन आंदोलनाची चर्चा जिल्हाभर रंगू लागल्याने सोयगावचे सातबाऱ्यांचे आंदोलन जिल्ह्यात गाजले आहे. नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणानंतर सातबारे मिळण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन तासाभरात माघारी घेण्यात आले होते.

नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणासाठी कर्मचारी रवाना
  
डिजिटल सातबारे मिळण्याचे संकेतस्थळ महिनाभरापासून सुरु होत नसल्याने महसूल विभागाच्या प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगळवारी रात्रीच नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणासाठी येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. बंद पडलेले पोर्टल सुरु न होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाला मिळाले असल्याने सोयगाव तालुक्यासाठी नवीन संकेतस्थळ तयार करण्यात येवून जिल्हाधिकारी कार्यालय सातबारे देण्याचा प्रयोग आखत असल्याने सोयगाव तहसील कार्यालयाचे पाच महसूल कर्मचारी तातडीने प्रशिक्षणासाठी औरंगाबादला रवाना झाले आहे.

Web Title: farmers protest sitting on the flag poll