Video : बिबट्यापासून वाचले, विहिरीत पडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

बिबट्याचा पाठलाग चुकवताना अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने निलगायीचे पिलू विहिरीत पडले. शेतकऱ्यांनी त्याला जीवदान दिले.

सोयगाव : बिबट्याचा पाठलाग चुकवताना अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने निलगायीचे पिलू सोमवारी (ता. 30) पहाटेच्या सुमारास विहिरीत पडले. शेतकऱ्यांनी दोर टाकून त्याला बाहेर काढत जीवदान दिले. ही घटना घोसला (ता. सोयगाव) शिवारात घडली. 

 

अजिंठ्याच्या डोंगररांगेतील घोसला गावाच्या शिवारात आपल्या शेतात नीलगायीचे (रोही) पिलू पडल्याचे मालक रवींद्र गवळी यांच्या सोमवारी सकाळी लक्षात आले. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने तब्बल तीन तासांच्या खटपटीनंतर या रोहीच्या पिलाला जखमी अवस्थेत बाहेर काढले.

पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. या बचाव मोहिमेत पांडुरंग तरल या शेतकऱ्याने विहिरीत उतरून दोरखंडाच्या साहाय्याने हे पिलू बाहेर काढले. या कामी प्रकाश वाणी, प्रमोद वाघ, प्रकाश बावसकर, प्रवीण गव्हांडे आदींनी सहकार्य केल्याचे शेतमालक रवींद्र गवळी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers rescued Nilgai from well