अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षामुळेच आम्हाला पदे आहेत. शेतकऱ्यांसह तळागाळातील घटकासाठी कायम धाऊन येणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतिदिनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षामुळेच आम्हाला पदे आहेत. शेतकऱ्यांसह तळागाळातील घटकासाठी कायम धाऊन येणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतिदिनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त परळी जवळील गोपीनाथगडावर शनिवारी (ता.3) आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, संयोजक तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार भीमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, खासदार सुनील गायकवाड, आमदार लक्ष्मण पवार, रमेश आडसकर आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ''विरोधक शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भ्रष्टाचाराने तिजोऱ्या भरलेल्या विरोधकांनी संप चिघळवून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे; परंतु आम्ही मुंडेंच्या संघर्षाच्या वारशातून आलो आहोत. म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय जाहीर करीत आहोत.'' 'कर्जमाफीतून अल्पभूधारक शेतकरी, आत्महत्यग्रस्त शेतकरी व थकबाकीदार सुटू नये, यासाठी समिती असेल', असेही त्यांनी सांगितले.

'शेतकरी संपा'विषयीच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

2019 मध्ये रेल्वेमध्ये बसून येऊन दिवंगत मुंडेंचे स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तत्पूर्वी, नगर परळी बीड या लोहमार्गातील परळी ते बीड या लोहमार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. या वेळी सुरेश प्रभू, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आदींनी आपले विचार व्यक्‍त केले. सूत्रसंचालन खासदार प्रीतम मुंडे यांनी केले.

 

Web Title: farmers strike marathi news maharashtra farmers aurangabad news beed news devendra fadnavis sakal esakal