नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

file photo
file photo

नांदेड :  शेतातील सोयाबीनच्या पिकांना कोम फुटल्याने हातचे पीक डोळ्यासमोर उध्वस्त झाले. या नापिकीमुळे नैराशेत जगणाऱ्या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शिरड (ता. हदगाव) शिवारात मंगळवारी (ता. १२) सकाळी अकराच्या सुमारास घडली.


शिरड (ता. हदगाव) येथील शेतकरी ओमकार परमेश्‍वर वानखेडे (वय ३०) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. तरीसुध्दा ते हिम्मत न हारत दरवर्षी पेरणी करीत असत. यावर्षीही त्यांनी मोठ्या उमेदीने पेरणी केली. नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाचे उत्पन्न मिळावे यासाठी त्यांनी सोयाबीनची पेरणी केली.

मात्र सततचा पाऊस पडल्याने सोयाबीनला कोम फुटले. काढणीला आलेले सोयाबीन हातचे गेल्याने शेतकरी ओमकार वानखेडे खचुन गेले. या नैराशेत त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांनी हदगाव पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हदगाव पोलिस करित आहेत.

हे ही वाचा 


नांदेड : विहीरीत पाय घसरून पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बिलोली तालुक्यातील लोहगाव शिवारात मंगळवारी (ता. १२) दुपारी तीन वाजता घडली.

 
लोहगाव (ता. बिलोली) येथील शेतकरी व्यंकट एकनाथ वानोळे (वय ४८) हे आपल्या शेतावर मंगळवारी कामासाठी गेले होते. दुपारी आपल्याच शेतातील विहीरीवर पाणी काढण्यासाठी गेले. पाणी काढत असतांना त्यांचा पाय घसरून ते तुडूंब भरलेल्या विहीरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब सायंकाळी उशिरा समजली. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते विहीरीत तरंगताना आढळून आले.

त्यांनी लगेच रामतिर्थ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहीरीतील मयत शेतकरी व्यंकट वानोळे यांच्या मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी शासकिय रूग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी हणमंत एकनाथ वानोळे यांच्या माहितीवरून रामतिर्थ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक पठाण करित आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com