नापिकीला कंटाळुन शेतकऱ्याची आत्‍महत्या

वृत्तसंस्था
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

कळमनुरी तालुक्‍यातील येहळेगाव गवळी येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापीकीमुळे बँकेचे कर्ज कसे  फेडावे म्‍हणून शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्‍महत्या केल्याची घटना रविवारी (ता.18) सकाळी घडली. 

हिंगोली- कळमनुरी तालुक्‍यातील येहळेगाव गवळी येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापीकीमुळे बँकेचे कर्ज कसे  फेडावे म्‍हणून शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्‍महत्या केल्याची घटना रविवारी (ता.18) सकाळी घडली. 

या बाबत माहिती अशी की, कळमनुरी तालुक्‍यातील येहळेगाव गवळी येथील युवा शेतकरी जयाजी व्यंकोजी मंदाडे (वय 30) यांनी महाराष्‍ट्र ग्रामीण बँक शाखा आखाडा बाळापूर येथून 99 हजाराचे पिककर्ज घेतले आहे. यावर्षी झालेल्या अत्‍यल्प पावसाने नापीकी झाली. तसेच पाण्याअभावी रब्‍बीच्या पिकांची पेरणी करतात आली नाही. पेरणी करण्याचा निर्णय घेतला होता. 

मात्र बोअरवेलचे पाणी आटल्याने पेरणी करता आली नाही. खरीप व रब्‍बी गेल्याने आता बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे याची चिंता असल्याने त्‍यांनी रविवारी सकाळी त्याच्या शेताच्या शेजारी असलेले सतोजी मंदाडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्‍महत्या केली. या बाबत शिवाजी मंदाडे यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

Web Title: Farmers Suicide In Hingoli District