तीन शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नांदेड - मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आज आणखी तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नापिकी, कर्ज आणि आजारास कंटाळून हिंदोळा (ता. कंधार) येथे एका शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन शनिवारी (ता. सात) आत्महत्या केली. कमलबाई गणपती जाधव (वय 45) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

दुसऱ्या घटनेत मांडवी (ता. किनवट) येथे नापिकी आणि कर्जास कंटाळून सुजय गेमसिंग डोंगरे (वय 21) या तरुण शेतकऱ्याने मंदिराच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. आठ) सकाळी ही घटना उघडकीस आली. तिसऱ्या घटनेत रजापूर (ता. पैठण) येथील रंगनाथ आसाराम दाभाडे (वय 65) यांनी स्वतःच्या शेतात रविवारी (ता.8) पहाटे पाचच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली. रजापूर शिवारातील शेतात ते राहत होते. श्री. दाभाडे यांनी विष घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. 

Web Title: farmers suicide in marathwada