नांदेड, हिंगोलीत शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नांदेड - सततची नापिकी व बॅंकेतून काढलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने सुभाष नागोराव गुलेवाड (वय 45) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना हदगाव तालुक्‍यातील पिंपराळा येथे घडली. गुलेवाड यांनी घर चालविण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढले होते. नापिकीमुळे उत्पन्न घटल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच त्यांनी शनिवारी (ता. 4) दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. बालाजी गुलेवाड यांच्या माहितीवरून तामसा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत हिंगोली जिल्ह्यातील जवळा (बुद्रुक) (ता. सेनगाव) येथून जवळच असलेल्या देऊळगाव जहागीर येथील शेतकरी संभाजी लिंबाजी गलंडे (वय 30) यांनी शेतीमालाला भाव मिळाला नसल्याच्या कारणावरून रविवारी (ता. 5) गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: farmers suicide in Nanded, hingoli