लातूर, जालन्यात शेतकरी आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

लातूर जिल्ह्यातील तेलगाव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दोन शेतकऱ्यांनी आज आत्महत्या केली. तेलगाव येथील शेतकरी व्यंकट येणगे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्जामुळे ते विवंचनेत होते, असे सांगण्यात आले.

लातूर - लातूर जिल्ह्यातील तेलगाव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दोन शेतकऱ्यांनी आज आत्महत्या केली. तेलगाव येथील शेतकरी व्यंकट येणगे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, कर्जामुळे ते विवंचनेत होते, असे सांगण्यात आले.

बदनापूर येथील शेतकरी बळीराम कान्हूले यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. नापिकीमुळे कर्ज फेडीच्या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers suicides in Latur, Jalna