कर्ज बाजारी शेतकऱ्यांची विष घेऊ आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मुक्रमाबाद - शेतात  होत आसलेली सततची नापीकी  व  वाढत चाललेला कर्जाचा डोंगर  यामुळे कर्ज कसे फेडावे व संसार कसा चालवा या विवंचनेत गेल्या अनेक वर्षापासून  असलेल्या  एका शेतकऱ्यांने  शुक्रवार दि२७ रोजी दुपारी आडीच वाजता आपल्या शेतात विषारी द्रव्ये पिऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. 

मुक्रमाबाद - शेतात  होत आसलेली सततची नापीकी  व  वाढत चाललेला कर्जाचा डोंगर  यामुळे कर्ज कसे फेडावे व संसार कसा चालवा या विवंचनेत गेल्या अनेक वर्षापासून  असलेल्या  एका शेतकऱ्यांने  शुक्रवार दि२७ रोजी दुपारी आडीच वाजता आपल्या शेतात विषारी द्रव्ये पिऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. 

मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील गोंविदराव रामराव सुर्यवंशी वय ६५ या शेतकऱ्यांने  आपल्या शेतातही इतरां सारखे उत्पादन व्हावे व आपलीही आर्थिक प्रगती होऊन आपले कुटुंबही सुखी व्हावा यासाठी धडपड करत आपल्या मालकीच्या साडेतीन एकरावर  तीन वर्षापुर्वी ठिंबक तुषार घेण्यासाठी पुसद अर्बन बँक शाखा नांदेड कडून नव्वद हजार रुपये कर्ज घेतले. तेवढे कर्ज घेऊन ही , शेतात म्हणावे तसे उत्पादन होत नसल्यामुळे  या बँकेचे कर्ज दिवसेंदिवस  वाढत होते. त्यात घर खर्च डोईवर होत असल्यामुळे पुन्हा या शेतकऱ्यांने स्टेट बँक अॉफ गोजेगाव येथून शेतावर साठ हजार रूपये एवढे कर्ज घेतले होते. एवढे करूनही शेतात काहीच उत्पादन होत नव्हते ,   त्यातमुळे या शेतकऱ्यांने आपले घर खर्च चालविण्यारठी  खासगी सावकाराकडूनही पैसे घेतलेले होते.त्यामुळे  डोक्यावर कर्जाचा  डोंगर  वाढलेला होता. त्यात  खासगी सावकाराकडून व  सदरील दोन्ही  बँकेकडून पैसे भरण्यासाठी तगादा वाढला होता. तर त्यात घर खर्च कसा चालवायचा दोन्ही बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचानेत येथील शेतकरी आडकला होता. या डोईवर वाढलेला कर्ज फेडता येत नसल्यामुळे शेवटी या शेतकऱ्यांने आपल्या शेतातच विषारी द्रव्ये घेऊन आत्महत्या केली .

व्यंकट सुर्यवंशी यांनी दिलेल्या जबाबवरून मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के.पी. जाधव , बीट जमादार आर.जी. आलूरे , हे, करीत आहेत.

Web Title: Farmers take poison to suicide