गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सोनपेठ (परभणी) : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तलाठी व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध (ता. 07) तहसील कार्यलयात शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

सोनपेठ (परभणी) : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तलाठी व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध (ता. 07) तहसील कार्यलयात शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

तालुक्यातील आवलगाव महसूल मंडळातील तब्बल दहा गावात (ता. 13) फेब्रुवारी रोजी अचानक गारपीट होऊन असंख्य असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानी संदर्भात प्रशासनाच्या वतीने सर्व्हे करण्यात येऊन शासनाने तब्बल 1 कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी दिला होता. मात्र संबधित गावांचे तलाठी व महसुलाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून केवळ मर्जीतल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप केल्याचा आरोप त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केला होता.

याबाबत शेतकऱ्यांनी तलाठी रमेश लटपटे यांच्यावर कारवाई करावी तसेच अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वाटप करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे ता. 31 मे रोजी करण्यात आली होती. मात्र महसूल विभागाने आजतागायत कुठलीही कारवाई न केल्यामुळे संबधित गावातील पाच शेतकऱ्यांनी (ता. 07) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

Web Title: farmers trying to suicide in sonpeth parbhani