दारूमुळे शेतकरी आत्महत्या करतात, हे म्हणणे चुकीचे - बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नांदेड - दारू पिल्यामुळे किंवा दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे आहे. इतर लोकही दारू पितात. त्यांनी आत्महत्या केली का, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी येथे उपस्थित केला. 

नांदेड - दारू पिल्यामुळे किंवा दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे आहे. इतर लोकही दारू पितात. त्यांनी आत्महत्या केली का, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी येथे उपस्थित केला. 

आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावापर्यंत शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे. नागपूर येथे गेल्या अकरा एप्रिलला नागपूरहून सुरू झालेल्या या यात्रेचे बुधवारी रात्री उशिरा येथे आगमन झाले. गुरुवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र, राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

तरीही शेतकरी, शेतमजूर त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर अधारित शेतमालाला भाव, स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन त्यांना तीन वर्षे झाली तरी अंमलबजावणी झालेली नाही. खासदार, आमदारांच्या वेतनात भरमसाट वाढ केली जात असताना शेतकऱ्यांचे काय? यासंदर्भात स्मरण करून देण्यासाठी ही यात्रा काढल्याचे त्यांनी नमूद केले. आश्वासनांचा विसर पडलेल्या मोदी यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा यवतमाळमध्ये उभारणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. हा पुतळा उलटा की सरळ उभारायचा हे ऐनवेळी ठरवू, अशी मिश्‍कील टिप्पणीही त्यांनी केली. केंद्र, राज्यातील सध्याचे सरकार अफजल खानापेक्षाही जास्त लुटारू असल्याची टीकाही त्यांनी केली. 

हेमामालिनी रोज दारू पितात ! 
दारूमुळे शेतकरी आत्महत्या करतात, हे म्हणणे चुकीचे असल्याचा मुद्दा पटवून देण्यासाठी श्री. कडू म्हणाले, "75 टक्के आमदार, खासदार आणि अन्य लोक दारू पितात. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी याही रोज एक बंपर दारू पितात. मग या लोकांनी आत्महत्या केली का? हेमामालिनी या भाजपच्या नेत्या, खासदारही आहेत. त्यांच्याबद्दल विधान करून कडू यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Web Title: farmers who committed suicide by wine, it is wrong to say