शेतकरीच होणार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

लातूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने वचननामा प्रसिद्ध केला आहे. यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शेतकरीच होईल, असे वचन देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उंबरठ्याचा विकास हाच पक्षाचा विश्‍वास आहे, हेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 

लातूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने वचननामा प्रसिद्ध केला आहे. यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शेतकरीच होईल, असे वचन देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक उंबरठ्याचा विकास हाच पक्षाचा विश्‍वास आहे, हेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गुरुवारी (ता. 9) येथे पक्षाचा वचननामा प्रकाशित केला. गुरुनाथ मगे, अख्तर शेख, शैलेश लाहोटी, मोहन माने, शैलेश गोजमगुंडे उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावांत दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न झाले. येत्या काळात उर्वरित गावांत ही योजना राबविली जाईल, प्रत्येकाला घर मिळावे या करिता प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबविली जाईल, गावे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, गावागावात प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येईल, कचरामुक्त लातूर हे आमचे उद्दिष्ट आहे, यासाठी आदर्श कचरा व्यवस्थापन करून दैनंदिन स्वच्छता राखली जाईल, जिल्हा परिषद शाळांची सुधारणा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे उभे केले जाईल, महिला ग्राम बचतगट सक्षमीकरण केले जाईल, कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती केली जाईल, आवश्‍यक तिथे स्वच्छतागृहे बांधले जातील, शिव रस्त्यांचे मजबुतीकरण केले जाईल, जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्के रस्ते, पक्‍क्‍या नाल्या, पथदिवे लावले जातील, जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे वचनही या वचननाम्यात देण्यात आले आहे. 

Web Title: Farmers will be chairman of the District Council

टॅग्स