'शेतकऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा कळणार हवामानाचा अंदाज'

Farmers will know the weather forecast twice a week
Farmers will know the weather forecast twice a week

औरंगाबाद : हवमानाच्या अंदाजावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता आठवड्याभरातून दोन वेळा हवामानाचा अंदाज कळविण्यात येणार आहे. 

महावेधच्या माध्यमातून जवळपास 80 लाख शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहचविला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील खरीप पेरणीपुर्व नियोजनाचा श्री. दिवसे यांनी आढावा घेतला. 

ते म्हणाले, येत्या खरीप हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीसोबतच प्रामुख्याने मका पिकावर आढळून आलेल्या फॉल आर्मी वर्मच्या आक्रमनाला नियंत्रीत करण्यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 80 प्रकारच्या पिकांवर आपली उपजिविका करणाऱ्या फॉल आर्मी वर्मचे जिवनचक्र कसे भेदता येईल तिचे आक्रमण कसे रोखता याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. राज्यात 14 हजार शेतीशाळा घेतल्या जाणार असून विद्यापिठाचे तज्ञ, कृषी विभागातील मास्टर ट्रेनर कृषी सखींना या शेतीशाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. प्रत्येक विभागाचे वॉटरशेड, जमीन आणि पाण्याच्या उपलब्धता त्यानुसार पिक व खतांच्या शिफारशी करण्यात येणार आहेत. 15 मे पासून साधारणपणे या कामाची सुरवात होणे अपेक्षित आहे. किड रोगांच्या प्रादुर्भावाची माहितीही ऍपच्या माध्यमातून जीआय मॅपींगद्‌वारे त्यावर नियंत्रणाचे प्रयत्न केले जाईल. 

शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांवर करवाई  -
येत्या खरीप हंगामात बियाणे, खताचा तुटवडाराज्यात 14 हजार शेतीशाळा घेतल्या जाणार असून विद्यापिठाचे तज्ञ, कृषी विभागातील मास्टर ट्रेनर कृषी सखींना या शेतीशाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. राहणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यानुषंगाने तीन बैठका कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झाल्या आहे. अनाधीकृत वा बोगस बियाणे, खते, निविष्‌ठा शेतकऱ्यांना देवून कुणी शेतकऱ्यांना फसवू नयेत. आतापर्यंत चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहे. असे केल्यास कारवाई तिव्र करण्यात येईल. असेही श्री. दिवसे यांनी सांगितले. बैठकीस विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, लातूरचे कृषी सहसंचालक तुकाराम जगताप उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com