घोषणा नको, आता कृती हवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० करण्यासाठी बुधवारी उपोषण
लातूर - केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० करावे. याआधी केवळ घोषणा करून सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आता घोषणा नको; कृती हवी आहे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बुधवारी (ता. दोन मे) लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात होणाऱ्या उषोषणात शहर व जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती सहभागी होणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट कमी करावी, यासह वेगवेगळ्या मागण्या आम्ही आजवर अनेकदा केल्या. त्यानंतर अनेकदा आम्हाला आश्वासने मिळाली; पण ती अद्याप पूर्ण झाली नाहीत. म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय किंवा विभाग हवा. स्वतंत्र मंत्री नेमला जावा. प्रत्येक वर्षाच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करावी. अंशत: पेन्शनधारकांना पूर्ण पेन्शनचा लाभ द्यावा, अशी आमची मागणी आहे.’’

महत्त्वाच्या काही मागण्या  
  ज्येष्ठांसाठी विनामूल्य आरोग्य विमा लागू करा
  ज्येष्ठांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
  ज्येष्ठ कारागीर, भूमिहीन शेतमजुरांना ५ हजार रुपये पेन्शन द्या
  शहरातील सर्व भागात विरंगुळा केंद्र सुरू करा
  निवृत्तिवेतन तीन हजार रुपये द्या. त्यात महागाईनुसार वाढ करा

Web Title: fasting for old people age