जालना : तलावात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

जालन्यातील घटना, दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह आढळले
मोतीबाग तलावात बुडालेल्यांचा शोध घेताना अग्निशमन दलाचे जवान.
मोतीबाग तलावात बुडालेल्यांचा शोध घेताना अग्निशमन दलाचे जवान. Sakal

जालना - जालना शहरालगत असलेल्या मोतीबाग तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. माणिक बापूराव निरवळ (वय ३७) व त्यांचा मुलगा आकाश माणिक निरवळ (१३, दोघे रा.एमआयडीसी परिसर, जालना) हे इतर तीन जणांसह पोहण्यासाठी तलावात उतरले होते. आकाश हा पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच माणिक हे त्याला वाचविण्यासाठी सरसावले. मात्र, दोघेही बुडाले. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, चंदनझिरा व कदीम जालना पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाने पाण्यात गळ टाकून, दोन तासांच्या प्रयत्नांनंतर माणिक व आकाश निरवळ या पिता-पुत्राचा मृतदेह बाहेर काढला. दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, विनय चव्हाण, रशीद शेख, संदीप दराडे, विठ्ठल कांबळे, सागर गडकरी, सूरज काळे अशोक गाढे, किशोर सगट, रवी बनसोडे आदींनी शोधकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com