Crime News : पित्यानेच केली पोटच्या मुलाला पट्ट्याने मारहाण; दगडाने फोडले डोके

‘आईसोबत गेल्याचे मला फोन करुन का सांगितले नाही,’ असं विचारत केली मारहाण
Crime News
Crime Newsesakal

छत्रपती संभाजीनगर : ‘आईसोबत गेल्याचे मला फोन करुन का सांगितले नाही,’ असे विचारत पित्याने १२ वर्षाच्या मुलाला दगडाने बेदम मारहाण केली. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला घाटीत दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

आयुब अली मोहम्मद शेख (३५, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) असे आरोपी पित्याचे नाव आहे. याप्रकरणी आयुब याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ मार्च रोजी आयुब यांचा मुलगा त्याच्या आईसोबत गेला होता.

Crime News
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

दरम्यान, साडेसहा दरम्यान आयुब याने त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला ‘तू तेरी मॉं के साथ गया था, तो तुने मुझे फोन क्यूं नही लगाया?’ असे म्हणत मुलाला कमरेच्या पट्ट्याने संपूर्ण अंगावर बेदम मारहाण करत दगडाने गंभीर जखमी केले. दरम्यान, तपास उपनिरीक्षक विलास पूर्णपात्रे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com