'त्या' दोघांना पित्यानेच ढकलले विहिरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

वैजापूर : तालुक्‍यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत शनिवारी (ता. 29) दोन बालकांचे मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. दोन्ही बालकांना पित्यानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. 

विहिरीत मृतावस्थेत आढळलेली दोन्ही भावंडे कन्नड तालुक्‍यातील गल्लेबोरगाव येथील असून त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (वय तीन) व गणेश संतोष वाळुंजे (वय पाच) अशी आहेत. पोलिसांनी संशयित पित्यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. 

वैजापूर तालुक्‍यातील सावखेडगंगा येथील बापूसाहेब पवार यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी (ता. 29) दुपारी दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुले वैजापूर तालुक्‍यातील नसल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मुलांच्या शर्टावरील प्लेग्रुप जेऊर या नावावरून ही मुले त्या शाळेतील आहेत का याचा तपास करण्यात आला. मात्र, या शाळेत मुलांची आई कामास असल्याने मुलांनी तेथील शर्ट घातल्याचे उघड झाले. वाळुंजे कुटुंब औरंगाबाद रस्त्यावरील गल्लेबोरगाव येथे राहत होते व संतोष वाळुंजे हा औरंगाबाद येथे काम करत होता. पत्नीशी कडाक्‍याचे भांडण झाल्याने दोही मुलांना घेऊन तो सावखेडगंगा परिसरात आला व त्याने दोन्ही मुलांना निर्दयीपणे विहिरीत ढकलून संपवले. याबाबत माहिती मिळताच वीरगाव पोलिसांच्या पथकाने संतोष वाळुंजे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

...असा झाला उलगडा 
सावखेडगंगा परिसरात आल्यानंतर संतोष वाळुंजे याने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करून तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन, असे धमकावले होते. या व्यक्तीला दोन्ही मुले विहिरीत सापडल्याचे कळताच त्याने त्वरित पोलिसांशी संपर्क साधल्याने तपासाला गती मिळाली. 

दोन्ही मुलांची ओळख पटली असून कृष्णा व गणेश अशी त्यांची नावे आहेत. ते कन्नड तालुक्‍यातील गल्लेबोरगाव येथील आहेत. खुनाबाबत पोलिस तपास करत आहेत. 
- हरीश बोराडे, सहायक पोलिस निरीक्षक, वीरगाव

Web Title: father killed 2 sons in vaijapur