मामाकडे नेण्याचे सांगत धाडले ‘यमा’कडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील येडशी येथे बायकोसोबत भांडणात मुलगा आईला साथ देतो याचा राग धरून मामाकडे घेऊन जातो असे सांगत त्याला दगडाने ठेचून यमसदनी धाडल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी (ता. 29) पहाटे घडला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपी पित्यास अठक केली आहे. 

हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील येडशी येथे बायकोसोबत भांडणात मुलगा आईला साथ देतो याचा राग धरून मामाकडे घेऊन जातो असे सांगत त्याला दगडाने ठेचून यमसदनी धाडल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी (ता. 29) पहाटे घडला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपी पित्यास अठक केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील बाबुराव भगवान शिखरे (वय 35) यास दारुपिण्याची सवय होती. यामुळे त्‍याचे बायकोसोबत सतत भांडण होत होते. या भांडणात तो बायकोला शिवीगाळ करून मारहाण करतो. आई, वडिलांच्या भांडणामधे नेहमीच वडिलांचीच चुक असल्यामुळे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा वैभव आईच्या बाजूने राहात होता. या गोष्टीचा बाबुराव शिखरे याला राग येत होता. 

दरम्‍यान, शुक्रवारी (ता. 28) रात्री त्याने याने मुलगा वैभवला तुला मामाकडे घेऊन जातो असे सांगून स्वतःच्या ऑटोरिक्षामध्ये बसवले. शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान नांदेड-हिंगोली रस्‍त्‍यावरील कुर्तडी पाटीजवळ रिक्षा थांबवला आणि अचानक त्‍याने वैभवचा दोरीने गळा आवळला. वडिलांनीच गळा आवळल्याने बेसावध असलेल्यावैभवला बचावाची संधीही मिळाली नाही. त्यानंतर त्याने वैभवचे डोके रिक्षावर जोरजोरात आदळले यामधे तो गंभीर जखमी होऊन तडफडत होता. त्यानंतर त्याने वैभवच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून केला. 

त्यानंतर बाबुराव शिखरे याने वैभवचा मृतदेह रिक्षात टाकून येडशी मावसभाऊ अरविंद शिखरे यांच्या दारात टाकून मी मुलाचा खून केला असे ओरडू लागला. त्‍यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, उपनिरीक्षक सविता बोधनकर, जमादार संतोष नागरगोजे, गजानन भालेराव, गजानन मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी बाबुराव शिखरे यास आरोपीस अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्‍यान, मयत वैभवचे शवविच्‍छेदन आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून त्‍याच्यावर येडशी येथे अंत्यसंस्‍कार करण्यात आले. मयत वैभव हा येडशी येथील भोजाजी नाईक आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. शाळेत या घटनेची माहिती मिळताच वैभवला श्रध्दाजंली अर्पण करून शाळेला एक दिवसाची सुट्टी देण्यात आली.

Web Title: Father killed his son in Hingoli