पोटाला चिमटा घेऊन मुलाला बनविले फौजदार 

नवनाथ इधाटे
शुक्रवार, 22 जून 2018

फुलंब्री (औरंगाबाद) : सततची दुष्काळी परिस्थिती आणि आयुष्याच्या पुंजीला असलेल्या गरिबीतून वारेगाव (ता.फुलंब्री) येथील विकास रावसाहेब जाधव याने लोकसेवा आयोगाच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवून फौजदार बनण्याचा मान पटकाविला आहे. विकासला फौजदार बनविण्यासाठी त्याचे वडील रावसाहेब जाधव व आई पुष्पाबाई जाधव यांनी काबाड कष्ट करीत पोटाला चिमटा घेऊन विकासला फौजदार बनविले. विकासच्या या यशामुळे तालुक्यतील सर्वच स्तरातून त्याचे अभिंनदन केले जात आहे.

फुलंब्री (औरंगाबाद) : सततची दुष्काळी परिस्थिती आणि आयुष्याच्या पुंजीला असलेल्या गरिबीतून वारेगाव (ता.फुलंब्री) येथील विकास रावसाहेब जाधव याने लोकसेवा आयोगाच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवून फौजदार बनण्याचा मान पटकाविला आहे. विकासला फौजदार बनविण्यासाठी त्याचे वडील रावसाहेब जाधव व आई पुष्पाबाई जाधव यांनी काबाड कष्ट करीत पोटाला चिमटा घेऊन विकासला फौजदार बनविले. विकासच्या या यशामुळे तालुक्यतील सर्वच स्तरातून त्याचे अभिंनदन केले जात आहे.

ग्रामीण भाग म्हणल्यावर शिक्षणाची सुविधा नाही, योग्य मार्गदर्शक नाही. या कोणत्याही गोष्टीला थारा न देता विकास जाधव  यांने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उज्जवल यश संपादन केले आहे. सकाळशी बोलताना विकास जाधवने सांगितले की, अतिशय बिकट परिस्थितून आई- वडीलांनी व मोठ्या भावाने माझ्या शिक्षणाचा खर्च केला आहे. केवळ दोन एकर शेती होती. त्यातून उदारनिवाह भागविणे कसरतीचे असल्याने आई-वडिलांनी काबाड कष्ट करून आम्हा भावंडांना शिकविले आहे.विकासचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण वारेगाव येथील राजीव गांधी हायस्कूलमध्ये झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण किनगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले. त्यांनतर बी.ए.ग्रज्युएशन खुलताबाद येथील चीस्तीया महाविद्यालयात झाले.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लोकसेव आयोगाची 2012 पासून विकास जाधवने तयारी सुरू केली होती. सुरवातीला औरंगाबाद, पुणे या दोन शहरात त्याचा सातत्याने अभ्यास सुरु होता. घरची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने क्लासेस, राहण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र तरीही विकासचे वडील रावसाहेब जाधव यांनी हातात येईल ते काम करून सतत विकासला शहरात पैसे पाठवत राहिले. पुण्याला इंग्रजीच्या क्लासेससाठी गेल्यानंतर वातावरनात बदल झाल्याने विकासला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पुण्याच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने मला सतत प्रेरणा मिळत राहायची आणि मी 2012 पासून दररोज आठ ते दहा तास अभ्यास करायचो.

बघता बघता तेथील मित्र भेटत गेले आणि त्यांच्या सहवासात राहून आपण कुठे कमी आहोत याची जाणीव त्यांच्याकडून नियमित करून घेत असे. विकास जाधव यांचे मित्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक बनलेले आहे. त्यांच्याकडून वेळोवेळो मार्गदर्शन घेण्याचे काम विकास जाधवने  केले. लोकसेवा आयोगाची तयारी करीत असताना तीन वेळेस अपयश आले. परंतु विकासचे वडील रावसाहेब जाधव यांनी विकासला सतत प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याचा रास्ता मोकळा करून देत होते. खर्चाचा मोठा प्रश्न निर्माण होत होता परंतु जाधव कुटुंबीयांनी मुलांच्या शिक्षणात कोठेही तडजोड केली नाही.

आई-वडिल व मोठ्या भावामुळेच आज मी या यशाच्या शिखरावर पोहचू शकलो. एमपीएससीची तयारी करीत असलेल्या मुलांनी आगोदर ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामध्ये असंख्य अडचणी येईल, कित्येक वेळा अपयश सुद्धा येईल. परंतू तरीही खचून न जाता अभ्यासाचे सातत्य कायम ठेवावे. 
- विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक, रँक 327

Web Title: father makes son police sub inspector