अनैतिक संबंधात आड आल्याने केला पोटच्या मुलाचा खुन! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद- पोटचा मुलगा अनैतिक संबंधाच्या आड येत असल्याने दीड वर्षांपुर्वी झोपेत त्याचा गळा आवळला. ही आत्महत्या भासविण्यासाठी वडीलाने त्याच्या गळी फास चढवून लटकवला. वरवर आत्महत्या वाटलेला मृत्यू मात्र नंतर खुनात बदलला. मुलाचा गळा आवळुन खुन झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालातुन समोर आले. या प्रकरणात संशयित वडीलाला मुलाच्या खुनप्रकरणी नऊ ऑक्‍टोरला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अशोक सदाशिव जाधव (वय 57, रा. रेणुकानगर, गारखेडा) असे संशयित वडीलाचे नाव आहे. त्यांचा मुलगा राहुलने 25 एप्रिल 2018 ला गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. वरवर त्याने आत्महत्या केली अशी बाब सुरुवातीला वाटली. त्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी नेला तपासणीही झाली. त्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात गळा दाबल्याने राहुलचा मृत्यु झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ती आत्महत्या नव्हे तर खुन होता, या बाबीने पोलिसही चक्रावले. त्यांनी लगेचच तपासाला सुरुवात केली.

त्यानंतर अशोकची पत्नी चंद्रकला यांची चौकशी केली. त्यानंतर शेजाऱ्यांचीही पोलिसांनी विचारपुस केली. तेव्हा अशोक याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मुलगा राहुल या संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे अशोकने राहुल खोलीत झोपल्यानंतर त्याचा गळा आवळुन खुन केला. या प्रकरणात बारकाईने तपास करुन अशोक जाधवला अटक करण्यात आली. 

असा होता बनाव 
राहुलने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी अशोकने त्याला बेडसीटचा फास दिला नंतर त्याला छताला लटकविले. त्यामुळे घरासह शेजाऱ्या पाजाऱ्यांना राहुलने आत्महत्या केल्याचे वाटले. अशा पद्धतीने त्याचा बनाव सुरुवातीला यशस्वी झाला. असे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. 
-- 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father murdered by immoral relationship