शेताच्या बांधावरुन भांडण, बापलेक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

रघुनाथपूरवाडी (ता. वैजापूर) येथे शेतीच्या बांधावरून भावकीत झालेल्या भांडणात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 16) घडली. जखमी दगू काशीनाथ जाधव (वय 61), मुलगा रामचंद्र काशीनाथ जाधव (वय 35) या बापलेकांच्या डोक्‍याला मारहाणीत गंभीर मार लागून जखमी झाल्याने शिऊर पोलिसांनी त्यांना शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारकामी पाठविण्यात आले.

शिऊर  (जि.औरंगाबाद) : रघुनाथपूरवाडी (ता. वैजापूर) येथे शेतीच्या बांधावरून भावकीत झालेल्या भांडणात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 16) घडली. जखमी दगू काशीनाथ जाधव (वय 61), मुलगा रामचंद्र काशीनाथ जाधव (वय 35) या बापलेकांच्या डोक्‍याला मारहाणीत गंभीर मार लागून जखमी झाल्याने शिऊर पोलिसांनी त्यांना शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारकामी पाठविण्यात आले. येथे प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची शिऊर पोलिस ठाण्यात अद्याप कुठलीही गुन्हा नोंद झाली नाही.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय शरीरसाैष्ठव स्पर्धेत हर्षदा पवारला सुवर्ण, पाहा PHOTOS

पोलिस पाटलाच्या मुलाला मारहाण
शिऊर : भटाना (ता. वैजापूर) येथील पोलिस पाटील यांचा मुलगा चंद्रकांत भगवान रोठे (वय 36) हे शेतातून घरी जात असताना बसस्थानकाशेजारील पाण्याच्या टाकीजवळ गावातील मद्यप्राशन केलेल्या एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. 16) घडली. जखमी चंद्रकांत भगवान रोठे (वय 36) यांच्या डोक्‍याला मारहाणीत मार लागून जखमी झाल्याने शिऊर पोलिसांनी त्यांना शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता रोठे यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची शिऊर पोलिस ठाण्यात अद्याप कुठलीही गुन्हा नोंद झाली नाही.

हेही वाचा- सात लाख चाेरुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पानवी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा
महालगाव ः पानवी (ता. वैजापूर) शिवारात भरदिवसा तलावाच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वीरगाव पोलिसांनी शनिवारी (ता. 16) अचानक छापा टाकला. या कारवाईत 21 हजार 610 रोख रक्कम व तीन दुचाकी वाहने असा एकूण 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करून जुगार खेळणाऱ्या सहाजणांपैकी तीनजणांना पकडले, तर तिघेजण फरारी झाले.

खबऱ्याकडून वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरख शेळके यांना महालगाव-पानवी शिवारातील तलावाच्या काठावर काही प्रतिष्ठित मंडळी खुलेआम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अरविंद गटकूळ यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, पोलिस कर्मचारी सरोदे, मल्हारी यांच्या पथकाने शनिवारी दुपारी चार वाजता त्या ठिकाणी अचानक छापा टाकून जुगार खेळताना शंकर माणिक मतकर (रा. वरखेड), लक्ष्मण विठ्ठल गायकवाड (रा. महालगाव), भाऊसाहेब पुंजाराम झिंजुर्डे (रा. वरखेड), रंगनाथ शंकर आल्हाट (रा. महालगाव), नाना सुभाष जाधव (रा. महालगाव), आबा रोकडे (रा. मांजरी) अशा जुगार खेळणाऱ्या सहाजणांविरोधात वीरगाव पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक अरविंद गटकूळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Son Injured Vaijapur