निर्दयी बापाचे कृत्य; रॉकेल ओतून मुलांना पेटविण्याचा प्रयत्न 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 2 जुलै 2019

आगपेटी पेटविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्याची पत्नी मोठ्याने ओरडली. यावेळी शेजारी धावून आले आणि त्याला आग लावण्याअगोदर ताब्यात घेतले. नसता मोठा अनर्थ टळला असता. या प्रकरणी सोनी दत्ता हाके यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नांदेड : शेतीच्या वादातून एकाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करून दोन बालकांवर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीच्या ओरडण्याने शेजारी धावून आल्याने हा अनर्थ टळला. पोलिसांनी पतीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला लोहा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले. हा खळबळजनक प्रकार पोलिसवाडी (ता. लोहा) येथे सोमवारी (ता. एक) सकाळी सात वाजता घडली. 

पोलिस सुत्रांच्या माहितीवरून लोहा शहरापासून अवघ्या चार किलोमिटर अंतरावर पोलिसवाडी गाव आहे. या गावात दत्ता राजाराम हाके (वय २५) यांचे आणि त्यांचा सासरा व चुलत सासरा यांची शेती एकमेकांच्या जवळजवळ आहे. धुऱ्याच्या वादातून या तिघांमध्ये नेहमी वाद होतो. असाच वाद सोमवारी (ता. एक) सकाळी सासरा व चुलत सासऱ्यासोबत झाला. रागाच्या भरात दत्ता हाके हा आपल्या घरी आला. तुझ्या बापाने चुलत्याला धुऱ्याबद्दल चुगली केली. त्यामुळे मला त्रास सहन करावा लागला. आता मी तुम्हाला जीवंत ठेवणार नाही म्हणून त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी आईजवळ असलेली दोन भावंड एक चार वर्ष व व दुसरा दोन वर्ष हे रडु लागले. सैतान डोक्यात शिरलेल्या दत्ता हाके याने घरातून रॉकेल आणून दोन्ही बालकांच्या अंगावर टाकले.

आगपेटी पेटविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्याची पत्नी मोठ्याने ओरडली. यावेळी शेजारी धावून आले आणि त्याला आग लावण्याअगोदर ताब्यात घेतले. नसता मोठा अनर्थ टळला असता. या प्रकरणी सोनी दत्ता हाके यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक बालाजी मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गुलाब राठोड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी दत्ता हाके याला दुपारी अटक केली. लोहा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी नांदेड कारागृहात केली. या प्रकरणाचा तपास श्री. राठोड हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father try to killed sons in Nanded