बाबा तुम्ही नसता तर...

मयुरेश माने, गुहागर
गुरुवार, 23 जून 2016

बाबा 
बाबा तुम्ही नसता तर , 
आम्ही हे जग पाहिलेच नसते.. 
जीवनातील प्रत्येक टप्प्यावर 
नवीन सुख चाखलेच नसते ।।1।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
कोणी माझ्या बरोबर खेळलेच नसते.. 
या तंत्रज्ञानाच्या जगात राहूनसुद्धा 
लॅपटॉप , मोबाईल पाहिलेच नसते ।।2।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
मी हट्ट कोणाकडे केला असता? 
अन्‌ माझी बिकट अवस्था पाहून 
बिचार्या आईचा पदर भिजला असता ।।3।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
कशासाठी जगायचं याचं उत्तर कळालेच नसते. 
नात्यांची गुपिते उकलून सुद्धा 
आठवणीत कसे गुंफले असते ।।4।। 

बाबा 
बाबा तुम्ही नसता तर , 
आम्ही हे जग पाहिलेच नसते.. 
जीवनातील प्रत्येक टप्प्यावर 
नवीन सुख चाखलेच नसते ।।1।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
कोणी माझ्या बरोबर खेळलेच नसते.. 
या तंत्रज्ञानाच्या जगात राहूनसुद्धा 
लॅपटॉप , मोबाईल पाहिलेच नसते ।।2।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
मी हट्ट कोणाकडे केला असता? 
अन्‌ माझी बिकट अवस्था पाहून 
बिचार्या आईचा पदर भिजला असता ।।3।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
कशासाठी जगायचं याचं उत्तर कळालेच नसते. 
नात्यांची गुपिते उकलून सुद्धा 
आठवणीत कसे गुंफले असते ।।4।। 

बाबा तुम्ही नसता तर , 
संस्कारांचा अविरत पाऊस मी झेलला नसता. 
आसवांची सोबत घेऊन सुद्धा जिंदगीभर 
माणुसकीचा धडा गिरवलाच नसता ।।5।।

Web Title: Father's Day

टॅग्स