बायोगॅस प्लांटमधून दररोज चार टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

गणेश पांडे  | Monday, 28 September 2020

परभणी महापालिकेचा बोरवंड येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु झाला असून ओल्या कचऱ्यावर बायोगॅस संयत्रच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. यासाठी परभणी शहरातून कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून कचरा बोरवंड येथे पाठवला जातो. 

परभणी ः परभणी शहरातही टाकाऊ कचऱ्याची समस्या मोठी आहे. धाररोडवर कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेले असून त्याचे घातक परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू, महत्प्रयासानंतर एक आशेचा किरण दिसून येत असून शहरातील कचऱ्याची समस्या काही अंशानेका होईना महापालिकेचा बोरवंड येथील प्रकल्प अखेर सुरु झाला आहे. सद्यस्थितीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सुरु झाली आहे. 

महापालिकेला शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी १८ कोटीचा निधी साधारणतः तीन वर्षापुर्वी मिळाला आहे. परंतू, त्यानिधीतून महापालिका वेळेत घनकचरा प्रकल्प उभारू शकली नाही. परंतू, हेही नसे थोडे या म्हणीप्रमाणे बोरवंड येथे हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या ठिकाणची बायोगॅस संयंत्रे सुरू झालेली असून दररोज चार ते पाच टण ओल्या कचऱ्यापासून खत व विद्युत निर्मिती होत असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. अद्यापही या प्रकल्पाचे विविध टप्पे अपूर्णच असून त्यासाठी तांत्रिक मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे सांगण्यात येते. या टप्प्यात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. 

हेही वाचा - 

शहरात दररोज सव्वाशे टन कचरा 
शहरात दररोज घरगुती, व्यापारी व औद्योगीक असा १०० ते १२५ टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १० ते १५ टन कचरा ओल्या स्वरुपाचा असतो. त्यावरच या प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार असून खत निर्मिती बरोबरच प्रकल्पासाठी आवश्यक असलेली विद्युत निर्मिती देखील होणार आहे. या प्रकल्पाची क्षमता दररोज दहा टन आहे. त्यासाठी पालिकेने तीन ठिकाणी कचरा संकलीत करण्यासाठी रॅम्प तयार केल्याची माहिती असून तेथे ओला कचरा कॉम्पॅक्टरमध्ये भरून बोरवंड येथे पाठवला जाणार आहे. कंत्राटदाराने त्यासाठी तीन कॉम्पॅक्टर देखील खरेदी केली आहेत. उर्वरित कचरा मात्र अजुनही धाररोडवरील डंपिंग ग्राऊंडवरच जाणार असून तेथील ढिगारे पुन्हा वाढणार आहे. 

हेही वाचा - 

बायोमायनिंगची प्रक्रीय आवश्यक 
महापालिकेने या कचऱ्यावर बायोमायनिग पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्यासाठी सहा महिण्यांपुर्वी काही यंत्रे देखील लावण्यात आलेली आहेत. परंतू, अजुनही ती कार्यान्वित झालेली नाहीत. अन्य योजनेप्रमाणे इथेही प्रचंड विलंब होत आहे. अशी चर्चा सुरु आहे. महापालिकेचा कुठलाही प्रकल्प व योजना कधीच वेळेत पूर्ण होतांना दिसून येत नाही. त्यामुळे मोठा आर्थिक भूर्दंड होत असल्याचे बोलले जाते. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर