माध्यमांनी तटस्थ भुमीका जपणे गरजेचे : प्रा. डोळे

 पाचवी विवेक जागर परिषद बोलताना प्रा. डोळे
पाचवी विवेक जागर परिषद बोलताना प्रा. डोळे

परभणी : आम्हाला जन्माने नाही तर विचाराने पुरोगामी बनवले. जाती व्यवस्थेचे पडसाद माध्यमामध्येही उमटत असतात. देशातील माध्यम क्षेत्रात मुस्कटदाबी सुरु आहे. माध्यमांनी तटस्थपणाची भुमीका जपणे गरजे असताना तसे होताना दिसुन येत नाही. माध्यमांनी सत्यता मांडून देशविकासात सहभाग घेतला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.


लोकायत विचारमंचच्यावतीने पाचवी विवेक जागर परिषद येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक सभागृहात रविवारी (ता.१९) पार पडली. या वेळी डॉ. डोळे हे ‘लोकशाही समाजव्यवस्था : जात, धर्म, वास्तव आणि माध्यमे’ या विषयावर बोलत होते. उदघाटन कार्यक्रमास लोकायत विचारमंचचे अध्यक्ष डॉ. मा. मा. जाधव, डॉ. कमलाकर चव्हाण, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, प्राचार्य प्रल्हाद मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.डोळे म्हणाले, माध्यमे लोकांना गुंतवुन ठेवतात. सध्या सत्य लपवुन ठेवण्याचे काम केले जात आहे. माध्यमात समाजाचे खरे प्रतिबिंब उमटत नसल्याचे चित्र आहे. याक्षेत्रातील पत्रकारांची भुमिका बदलत चालली आहे. लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती पत्रकारांची संपल्याचे दिसत आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आगरकर यांची पत्रकारीता इतिहासजमा होत आहे. माध्यमांनी सत्यता मांडून देशविकासाचा वारसा चालवला पाहिजे, असे सांगुन माध्यम क्षेत्रात चातुर्वणव्यवस्था निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. संपादन आणि कार्यकर्तेपण यांची सांगड घातल्याशिवाय या व्यवस्थेला तडा जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी दुसऱ्या सत्रात समाजमाध्यमे आणि आपण सगळे यावर मुंबईच्या शर्मिष्ठा भोसले म्हणाल्या, समाज माध्यमे ही वंचीताचे प्रश्न मांडण्यासाठी एक माध्यम झाले आहे. कधी मुक्त तर कधी भडक संवाद होत आहे. अशा माध्यमांची अनेकदा गैरवापरदेखील होत असून तो रोखणे गरजेचे आहे. शेती, शेतकरी आणि माध्यमे यावर  या विषयावर बोलताना राजन क्षीरसागर म्हणाले. आज शेती व्यवसायाचे असंख्य प्रश्न उभे आहेत. शेती आणि शेतकरी उध्वस्थ झालेले आहेत. सत्तेतील मंडळी कायम  भांडवलदारांच्या बाजुने राहत असल्याने शेती प्रश्न मार्गी लागले नाहीत. माध्यमातून शेती प्रश्नावर अधिक तिव्रतेने व्यक्त होणे गरजेचे आहे. ‘वंचितांचे प्रश्न आणि माध्यमे’ यावर बोलताना आसाराम लोमटे म्हणाले, सद्यस्थितीत प्रत्येकाने डोळस झाल पाहिजे. मध्यमवर्गाने सामाजिक प्रश्नांकडे अस्थेने पाहिले पाहिजे. माध्यमांनी वंचीत आणि शेतमजुरांची प्रश्न मांडले पाहिजे. सर्वच प्रकारच्या माध्यमांतून वंचीताचे प्रश्न समोर आले पाहिजेत. सुत्रसंचलन प्रा.प्रल्हाद भोपे यांनी केले. मा. मा. जाधव यांनी परिषदेची भुमीका स्पष्ठ केली. डॉ. घुले यांनी प्रास्तावीक केले. प्राचार्य मोरे यांनी आभार मानले.
हेही वाच व पहा - Video : परभणीत साईभक्तांचे साई जागर आंदोलन ​


गैरवापर थांबला पाहिजे : डॉ. पाटील
स्त्रियांचे प्रश्न आणि माध्यमांची भुमीका या विषयावर बोलताना दिल्ली येथील डॉ. स्मिता पाटील म्हणाल्या, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार यावर माध्यमांनी कठोर भुमीक घेतली पाहिजे. समाज माध्यमांचा वापर राजकीय क्षेत्रातील महिलांना ट्रोल करण्यासाठी केला जात आहे. असा गैरवापर थांबला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com