नांदेडात ५७ लाखाचा गुटखा जप्त

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

अवैध गुटख्याचे कोठार बनलेल्या नांदेड शहरातून पुन्हा ५७ लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेनी मंगळवारी (ता. २९) वाजेगाव परिसरात केली. यावेळी दोन गुटखा माफियांना अटक केली.

नांदेड - अवैध गुटख्याचे कोठार बनलेल्या नांदेड शहरातून पुन्हा ५७ लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेनी मंगळवारी (ता. २९) वाजेगाव परिसरात केली. यावेळी दोन गुटखा माफियांना अटक केली. 

नांदेड शहरात गुटखा माफिया, मटका माफिया, वाळू माफिया यांच्यासह अवैध धंदे चालविणारे गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत आहेत. नाही यांच्यावर पोलिसांचा धाक किंवा महसुल प्रशासनाचा तसेच अन्न व औषध प्रशानाचा. यामुळे जिल्ह्यात अवैध धंदे रोजरोसपणे सुरू आहेत. अशाच एका गुप्त माहितीवरुन व पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी आपल्या पथकाला अवैध गुटखा साठा असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. यावरून पथकाने मंगळवारी दुपारी शहरातील वाजेगाव ते धनेगाव रस्त्यावर असलेल्या शेट्टी कॉम्पलेक्समधील एका गोदामावर छापा टाकला. या गोदामातून विविध ११ प्रकारचा शासनाकडून बंदी असलेला अनधिकृत गुटख्याचा साठा जप्त केला. हा गुटखा एका ट्रकमधून उतरल्या जात होता.

यावेळी पोलिसांनी हमद सलीम चाऊस आणि शेख अजीम शेख खमरु या दोघांना अटक केली. गोदामाची झडती घेऊन जवळपास ५७ लाख २१ हजार ४०० रुपयाचा गुटखा व ट्रक जप्त केला. ट्रक व गुटखा नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आणल्यानंतर अन्न व औषध विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांना बोलावून घेतले. जप्त केलेला गुटखा श्री. काळे यांनी आपल्या ताब्यात घेतला. वरील दोन्ही गुटखा माफियांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात गुटखा येत असेल किंवा अनधिकृत साठा असेल तर अन्न व औषध विभाग आणि पोलिस प्रशासन काय करित आहे असा प्रश्न नांदेडकरांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty lakh rupees gutkha seized in nanded crime