esakal | बीड जिल्हा कारागृहातील ५९ कैदी कोरोना पॉझिटीव्ह, रुग्ण संख्येत वाढ सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

Beed District Jail

बीड जिल्हा कारागृहातील तब्बल ५९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पोलिस दलात शिरकाव केलेल्या कोरोनाने आता कारागृहातही शिरकाव केला आहे.

बीड जिल्हा कारागृहातील ५९ कैदी कोरोना पॉझिटीव्ह, रुग्ण संख्येत वाढ सुरुच

sakal_logo
By
दत्ता देशमुख


बीड : जिल्हा कारागृहातील तब्बल ५९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पोलिस दलात शिरकाव केलेल्या कोरोनाने आता कारागृहातही शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार हजारांच्या घरात (तीन हजार ९९२) गेली आहे. दरम्यान, रविवारी (ता.२३) रात्री उशिरा तपासणी होऊन आलेल्या अहवालांत नवीन १२८ कोरोनाग्रस्तांची भर पडली. यामध्ये जिल्हा कारागृहातील ५९ आरोपींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. या अहवालात पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारीही बाधीत आढळले आहेत.

त्यापूर्वी चकलंबा पोलिस ठाण्यातील सात कर्मचारी बाधीत आढळले होते. कोरोना संसर्गाच्या सुरवातीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय योजनांत अव्वल असलेल्या जिल्ह्यात दोन महिन्यांनी (ता.१७ मे) कोरोनाने शिरकाव केला. हळुहळु कोरोना भलतेच पाय पसरत असून आता जिल्हा कारागृहातही कोरोनाने शिरकाव केला आहे. दरम्यान, मधल्या काळात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहात साध्या कैदेत असलेल्या आरोपींना तात्पुरता जामिन देण्यात आला हेाता. आता एकाच वेळी ५९ कैद्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९९ कोरोनाबळी गेले असून सध्या एक हजार ७७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

फेसबुकवर पोस्ट टाकून शेतकऱ्याची आत्महत्या, गेवराई तालुक्यातील घटना

परळी वैजनाथ शहरात आरोग्य प्रशासनाच्या वतीने व्यापारी, कामगार,रेशन दुकानदार, भाजी विक्रेते आदी नागरिकांच्या अॕन्टीजन टेस्ट तपासणी मंगळवारी (ता.१८) सकाळी ९ ते ६ पर्यंत चार बुथवर टेस्ट करण्यात आली. सायंकाळी ६ वाजे पर्यत १३२१ नागरिकांनी आपली अॕन्टीजेन तपासणी करुन घेतली आहे.या १३२१ पैकी १२५६ व्यक्ती निगेटिव्ह तर ६६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर येथे ३०१ नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये २७३ निगेटिव्ह तर २९ पॉझिटिव्ह, सरस्वती विद्यालय येथे २५५ नागरिकांची अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये २५० निगेटिव्ह तर ५ पॉझिटिव्ह, बस स्थानक येथील केंद्रावर ३४१ नागरिकांची अॕन्टीजेन तपासणी झाली यामध्ये ३२१ निगेटिव्ह तर २० पॉझिटिव्ह, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ४२४ नागरिकांची अॕन्टीजेन तपासणी झाली. यामध्ये ४११ निगेटिव्ह तर १३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व केंद्रावर उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटिल, वैद्यकीय अधीक्षक डॉ दिनेश कुरमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,नोडल अधिकारी डॉ. दिलीप गायकवाड आदी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

(संपादन - गणेश पिटेकर)