अभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी 

संदीप लांडगे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. 
या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरु होऊन हाणामारी सुरु झाली. यात अभिनेत्री जरीन सुद्धा मागे राहिली नाही, तिनेही एका चाहत्याच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे अभिनेत्री जरीन खान हिला तब्बल दोन तास शोरूम मधेच अडकून पडावे लागले. 

शुक्रवारी सिनेअभिनेत्री जरीनखान यांना पाहण्यासाठी कॅनोट प्लेस परीसरात युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रसांगी शोरूम मालकाने कुठलाही पोलिस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी बोलावले होते. यावेळी कॅनोट परीसरातील सर्व रस्त्यांवर गर्दी झाल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. प्रसंगी चाहते आणि बाउन्सर यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात झाली. यावादात दोन गट एकमेकांना भिडले आणि यावादाचे रुपांतर मोठ्या हाणामारीत झाले.

हाणामारीमुळे परीसरात गदारोळ, धावपळ सुरु झाली. लोक वाट्टेल तिकडे सैरभैर पळू लागले. यावेळी बाऊन्सर व चाहते हातात लोखंडी रॉड आणि दगड घेऊन रस्त्यावर राडा करू लागल्याने प्रकरण शांत होण्यास वेळ लागला. एक चाहता जरीनच्या जवळ गेला असता तिने त्या चाहत्याच्या कानशिलात वाजवली. यावेळी संतप्त तरुणांनी कॅनॉट प्लेस मधील बॅरिकेट्‌स आणि उभ्या असलेल्या दुचाकी फोडल्या. ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे अभिनेत्री जरीन खान यांना शोरूममध्येच तब्ब्ल दोन तास बसून काढावे लागले. 

Web Title: Fight between two groups to see actress Zarin Khan