सेलू : भरदिवसा दोन शिक्षकांचे गट एकमेकांना भिडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सेलू - येथील श्रीराम काॅलनीतील एका खासगी शिक्षण संस्थेतील दोन शिक्षकांत क्षुल्लक कारणावरून शनिवारी (ता.७) रोजी येथील एका मैदानावर तुंबळ हाणामारी झाली.शनिवारी रात्री उशिरा दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारीवरून एका शिक्षक गटावर अॅट्रोसिटी तर दुसऱ्या शिक्षक गटावरही मारहाणीचा गुन्हा सेलू पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला अाहे.

येथील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक पदावर काम करणारे विजय शिवाजी टेकाळे व गजानन रामराव ढाकरे या दोन शिक्षकात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळेत वाद झाला. या वादाचे रूपांतर शाळा सुटल्यावर येथील नूतन महाविद्यालयाच्या क्रिडा मैदानावर दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. भर दिवसा दोन शिक्षकांचे गट एकमेकांना भिडलेले पाहून विद्यार्थ्यांनीही तोंडात बोटे घातली. यामध्ये गजानन ढाकरे यांनी फिर्याद दिली आहे की, विजय शिवाजी टेकाळे, श्याम शिवाजी टेकाळे, राजेभाऊ कऱ्हाळे व इतर जणांनी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये सर्व आरोपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे करित अाहेत. 
 
Web Title: fight between two groups of teachers