Loksabha 2019 : चिखलीकरांच्या उमेद्‍वारीने  नांदेडची चुरस वाढणार

chikhalikar
chikhalikar

नांदेड : नांदेडच्या लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी (ता. 23) पहाटे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी चुरसीची लढत होणार, हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान ‘पहले तुम, बादमे हम’ अशा भूमिकेत दोन्ही पक्ष होते. परंतु, भाजपने उमेद्‍वाराची घोषणा केली. मात्र, कॉंग्रेसमध्ये अद्यापही सामसामुच बघायला मिळत आहे.

कॉंग्रेचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघ
बालेकिल्ला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या नांदेड जिल्ह्यात दोन सभा होऊनही कॉंग्रेस आपला बालेकिल्ला
जिंकण्यास यशस्वी ठरला होता. महापालिकेतही एकहाती सत्ता मिळवली.
महापालिकेत भाजप हा दोन नंबरचा पक्ष ठरला. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार भाजपने केला होता. त्याची वेळही आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

परंतु, भाजपकडून सात ते आठजणांनी लोकसभेची उमेद्‍वारी मागितल्यामुळे
पक्षश्रेष्ठींसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. ‘शिवसेने’तून भाजपमध्ये
आलेले लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभेच्या उमेद्‍वारीसाठी जोर लावला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर शनिवारी यश आले. मात्र, भाजपातील स्थानिक नेते जे की, लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांची मात्र निराशा झाल्याचे चित्र अाहे.

कॉंग्रेसमध्ये सामसुमच
लोकसभा निवडणुकीसाठी उमेद्‍वारांची यादी कॉंग्रेसतर्फे जाहीर केली जात
आहे. शनिवारी पहाटे औरंगाबाद, जालना लोकसभा उमेद्‍वारांची नावे जाहीर
केली. परंतु, नांदेड लोकसभेचा उमेद्‍वार कोण? हे अद्यापही स्पष्ट होत
नसल्याने कॉंग्रेसमध्ये सामसुमच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com