जरंडी मुख्याध्यापक प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Filed the complaint in the case of Jarandi principal
Filed the complaint in the case of Jarandi principal

औरंगाबाद - सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील प्राथमिक शाळेत सतत चार महिन्यापासून २१ विद्यार्थिनींशी अश्लील संवाद करणारा मुख्याध्यापक हरिदास काटोले याचे विरुद्ध बालकल्याण जिल्हा समिती औरंगाबाद यांच्या भेटीनंतर बाल कल्यान समिती व सोयगाव पोलीस यांच्या जरंडी चौकशीनंतर शनिवारी रात्री सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जरंडी मुख्याध्यापक प्रकरणाला अखेरीस पाचव्या दिवशी पूर्णविराम मिळाला आहे.

जरंडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक हरिदास काटोले हा सतत २१ विद्यार्थिनींशी अश्लील संवाद करून अश्लील हावभाव करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी आठवडाभरापूर्वी पालकांजवळ केल्यानंतर अखेरीस कामात गुंग असलेल्या पालकांनी मंगळवारी हा प्रकार शाळेत उघडकीस आणला होता. यावरून मोठे वादंग तयार होवून यामध्ये तातडीने गटविकास अधिकारी एम. सी राठोड व गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे यांनी केलेल्या संयुक्त चौकशी अहवालावरून बुधवारी या मुख्याध्यापकाला जिल्हा परिषदेने निलंबित केले आणि पालकांच्या सोयगाव पोलीस ठाण्यातील केलेली तक्रार माघारी झाली. परंतु पालकांनी ही तक्रार माघार घेण्याची कारणे शोधण्यासाठी शनिवारी जिल्हा बालहक्क कल्यान समितीने जरंडी गाठून विद्यार्थिनींशी थेट चर्चा करून या प्रकरणात जिल्हा बाल कल्यान समितीने गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले, शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बाल कल्यान समितीच्या अध्यक्षा अॅड. ज्योती पत्की यांनी सांगितले.

जरंडी शाळेला भेट-
दरम्यान बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. ज्योती पत्की, अॅड अनिता शिवूरकर, डॉ. मनोहर बनस्वाल, प्रा. अश्विनी लखमले, पोलीस निरीक्षक शेख शकील, आदींनी जरंडी शाळेला भेट दिली होती.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक गणेश जागडे, महिला पोलीस वैशाली सोनवणे, कविता मिस्तरी, सागर गायकवाड आदी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com