Vidhan sabha 2019 : वसमतमध्ये शेवटच्या दिवशी 16 उमेदवारांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

एकूण 21 जणांचे 28 उमेदवारी अर्ज 

विधानसभा 2019
वसमत (जि. हिंगोली) -
येथे अपक्षांसह विविध पक्षांच्या 16 जणांनी 20 उमेदवारी अर्ज आज (ता. चार) दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण फुलारी यांनी दिली.

 आज दुपारी तीनपर्यंत अॅड शिवाजीराव जाधव यांनी शक्ती प्रदर्शनासह अपक्ष दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मुनीर पटेल यांनी वंचित बहुजन आघाडीकडून तर  राजू  नवघरे पाटील यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 
तसेच मोहम्मद आवेज अन्सासारी आंबेडकर नॅशनल काँग्रेस, मजहर महेबुब शेख समाजवादी पक्ष व सत्तार कासिम पठाण मजलीस बचाव तहरीक,
गौतम मारोती दीपके बहुजन समाज पत्र यांच्यासह एकूण 16 जणांनी 20 उमेदवारी अर्ज दाखल केले. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत एकूण 21 जणांनी 28 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फुलारी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filled Candidate Application Form