तलवारीच्या धाकावर फिल्मीस्टाईल मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

औरंगाबाद - दाक्षिणात्य चित्रपटातील थरार बुधवारी (ता. नऊ) रात्री साडेनऊला शहरात पाहायला मिळाला. पूर्ववैमनस्यातून आपसांतच नातेवाईक भिडले. यानंतर दोघांना तलवारीच्या धाकावर बेदम मारहाण करण्यात आली. शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. यात पोलिसांनी तिघांना अटक केली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एका गटातील अविनाश चिंदे (वय २८, रा. शिवाजीनगर) यांना, तर दुसऱ्या गटातील विश्‍वास राठोड यांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. दोन्ही गटांतील एकूण अकरा ते बारा जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पोलिस अधिकारी श्रद्धा वायदंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून अविनाश चिंदे याला भररस्त्यात अडवून अचानक मारहाण सुरू झाली. यावेळी त्याचा भाऊ योगेशही मध्ये पडला. दरम्यान, दुसऱ्या गटातील लोकांनी त्याला लक्ष्य करून बेदम मारहाण सुरू केली. तलवारीचाही यावेळी धाक दाखविण्यात आला. त्यांना प्रत्त्युत्तरात मारहाण करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार विश्‍वास राठोडसह एकूण सात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली, तसेच अविनाशसह तिघांवर धारदार वस्तूने मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

वॉर भडकतेय...
शहरात तलवारीने वार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून धाकदडपशाही, दोन गटांतील वॉर भडकत आहे. जवाहरनगर भागातील त्रीमूर्ती चौक, तसेच गारखेडा परिसरात घटना घडल्या असून या घटनांवर अंकुश लावण्याची, तसेच तातडीने उपाय करण्याची गरज आहे.

Web Title: Filmistyle Beating Crime