सव्वादोनशे कोटींच्या रस्त्यांची यादी अंतिम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत २२५ कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी अंतिम झाली आहे. सर्वसाधारण सभेने यादी अंतिम करण्याचे महापौरांना अधिकार दिले होते. त्यानुसार त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून यादी अंतिम केली आहे. सोमवारी (ता. १७) ही यादी महापालिका आयुक्‍तांकडे सादर केली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटींतून होणाऱ्या रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी रस्त्यांसाठी आणखी १२५ कोटी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापौरासह पदाधिकाऱ्यांनी ७९ रस्त्यांची यादी आयुक्तांकडे सादर केली होती. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रस्त्यांची पाहणी करून २१२ कोटी ५५ लाख रुपयांच्या खर्चाच्या ५७ रस्त्यांच्या यादीचा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर केला होता. सभागृहात सर्वांनी  मिळून २२५ कोटींच्या रस्त्यांची यादी अंतिम करण्याचा निर्णय घेतला; तसेच रस्त्यांची यादी अंतिम करताना ज्या वॉर्डातून मालमत्ता कराची वसुली सर्वाधिक आहे, ज्या रस्त्यावर रहदारी जास्त आहे, विकास आराखड्यात रस्ता नसला तरी ज्या भागात रस्त्यांची अतिआवश्‍यकता आहे, अशा भागातील रस्त्यांचा समावेश करण्यात आला. रस्त्याचा समावेश करण्याचे व वगळण्याचा पूर्ण अधिकार महापौरांना देण्यात आले होते. त्यानुसार रस्त्यांची यादी अंतिम करून ती सोमवारी आयुक्तांना सादर केली जाणार आहे. 

रस्ते ५७ वरून झाले १००
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या ५७ रस्त्यांच्या यादीतील काही रस्ते वगळण्यात आले असून, नगरसेवकांनी सुचविलेल्या रस्त्यांचा समावेश यादीमध्ये केला जात आहे. सध्या ही यादी १०० पेक्षा अधिक रस्त्यांची तयार झाली आहे. ही यादी करताना मात्र २२५ कोटींची मर्यादा पाळली जाणार आहे. रस्त्यांच्या यादीमध्ये अनेक भागांतील रस्त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final list of side roads