esakal | जालना जिल्ह्यातील जवानाला अखेरचा निरोप; अमर रहे, वंदे मातरम् घोषणांनी परिसर गेला दणाणून
sakal

बोलून बातमी शोधा

Final Ritual On Solider Ganesh Gawande

भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील भारतीय जवान गणेश संतोषराव गावंडे यांना बुधवारी (ता.२३) हजारोंनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

जालना जिल्ह्यातील जवानाला अखेरचा निरोप; अमर रहे, वंदे मातरम् घोषणांनी परिसर गेला दणाणून

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील भारतीय जवान गणेश संतोषराव गावंडे यांना बुधवारी (ता.२३) हजारोंनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अमर रहे, भारत माता की जय, जब - तक सूरज चाँद रहेगा गणेश तेरा नाम रहेगा, वंदे मातरम् अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. तालुक्यातील भिवपुर येथील जवान गणेश गावंडे हे पंधरा वर्षांपासून भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली पुणे येथील मराठा बटालियन रेस कोर्स येथे झाली होती.

त्या ठिकाणी कर्तव्यावर असताना सोमवारी (ता.२१) त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांना वीरमरण आले. आज बुधवारी औरंगाबाद येथून त्यांचे पार्थिव भारतीय सैन्यदलाच्या वाहनातून त्यांच्या मूळगावी भिवपूर येथे सकाळी सात वाजता आणण्यात आले. यावेळी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून फुलांचा अर्पण करून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

गावा शेजारी असलेल्या त्यांच्याच शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात जवान गणेश गावंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नायब सुभेदार विजय हवालदार, प्रकाश काळे विलास नाईक, गिलानी शेख, माजी सैनिक संघटनेचे हवालदार विठ्ठल जगताप, हवालदार बाळू तायडे यांच्या वतीने सैन्यातर्फे मानवंदना देण्यात आली. तसेच पोलिस प्रशासनाकडून देखील फैरी झाडून त्यांना सलामी दिली. यावेळी त्यांची पत्नी व दोन मुलांनी त्यांना सलामी देताच सर्व उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

प्रशिक्षण बेळगावमध्ये
वीर जवान गणेश गावंडे यांनी बेळगाव येथे ट्रेनिंग घेऊन पंधरा वर्षे मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये देश सेवा केली. श्रीनगर, राजस्थान, दिल्ली, रामन व त्यानंतर त्यांची नुकतीच पुणे येथे पोस्टिंग करण्यात आली होती. त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने भिवपुरसह संपूर्ण तालुक्यावर  शोककळा
पसरली आहे.

संपादन - गणेश पिटेकर