बलात्कार प्रकरणातील आरोपीने कोठडीत घेतले फिनेल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

माजलगाव (जि. बीड) - शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या आशिष बोरा व मनोज फुलवरे या दोघांना माजलगाव न्यायालयाने सोमवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी मनोज फुलवरे याने पोलिस कोठडीत स्वच्छतागृह सफाईचे रसायन (फिनेल) पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची क्‍लिप काढून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून आत्महत्येच्या प्रयत्नातून बचावलेल्या पुनर्वसित गावातील पीडित मुलीचा जबाब घेऊन पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील अटक केलेला एंजल फोटो स्टुडिओचा संचालक प्रमोद कदम हा छायाचित्रकार यापूर्वीपासून पोलिस कोठडीत आहे. सोमवारी यातील आरोपी आशिष बोरा, मनोज फुलवरे यांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. यातील आरोपी मनोज फुलवरे याने कोठडीत फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी दोघांना 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Finel took custody of the accused