निधी हडप करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नांदेड : ग्रामविकासासाठी आलेला दोन लाखाचा शासकिय निधी हडप केल्या प्रकरणी तत्कालीन व सध्या निलंबीत असलेल्या ग्रामसेवकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हदगाव तालुक्यातील पळसा ग्रामपंचायत कार्यालयात सन 2015 ते 2016 या काळात नथुराम अशोक सुकळकर (वय 35) हा ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता. या दरम्यान हटकर व धनगर या वस्तीसुधार आणि पाणी पुरवठासाठी शासनाने दोन लाखाचा निधी दिला होता.

हा निधी ग्रामपंचायत खात्यात जमा झाला. मात्र ग्रामसेवकानी या निधीचा गावाच्या विकासासाठी खर्च केला नाही. त्याने परस्पर बनावट दस्तावेज तयार करून स्वत: च्या फायद्यासाठी उचलून शासनाची व जनतेची फसवणूक केली. या प्रकरणात संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली होती. दरम्यानच्या काळात त्याला अपहार केल्याप्रकरणी वरिष्ठांनी निलंबित केले होते. परंतु याच प्रकरणात गजानन पंजाबराव मस्के यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

Web Title: FIR has been lodged against Corrupt GramSewak