अप्सरा टॉकीजमध्ये मिनी थिएटरला आग

मनोज साखरे
शनिवार, 2 जून 2018

औरंगाबाद : शहरातील अप्सरा टॉकीजमधील एका मिनी थिएटरला आग लागल्याची घटना शनिवारी (ता. 2) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.

औरंगाबाद : शहरातील अप्सरा टॉकीजमधील एका मिनी थिएटरला आग लागल्याची घटना शनिवारी (ता. 2) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.

अप्सरा टॉकीजमधील थ्रीडी थिएटरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. खुर्च्यांना फोम असल्याने आग वाढत गेली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत कोणतीही प्राणहानी झाली नसून खुर्च्या आणि अन्य साहित्य जळाले अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी दिली. घटनास्थळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी केली. आगीमुळे सुमारे पाच लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: fire at apsara talkies