औरंगाबाद: कचऱ्याची आग बारदाना दुकानाला 

मनोज साखरे
सोमवार, 2 एप्रिल 2018

बाबूलाल भानुशाली यांचे जुना मोंढा भागात बारदानाचे दुकान आहे. या दुकानाला लगत पेटलेल्या कचऱ्याची झळ बसली. पाहता पाहता आग बारदाना दुकानाला लागली. सुमारे दोन तास आग धुमसत होती.

औरंगाबाद : औरंगाबादेत कचऱ्याचा प्रश्न भीषण असताना जागोजाग पडलेल्या कचऱ्याला आग लावून देण्याचे प्रकार घडत आहेत. अशाच एका पेटलेल्या कचऱ्याची झळ बारदाना दुकानाला बसली. यात मोठ्या प्रमाणावर बारदाना जळून खाक झाला. हि घटना सोमवारी (ता. 2) सकाळी सातच्या सुमारास जुना मोंढा भागात घडली.

बाबूलाल भानुशाली यांचे जुना मोंढा भागात बारदानाचे दुकान आहे. या दुकानाला लगत पेटलेल्या कचऱ्याची झळ बसली. पाहता पाहता आग बारदाना दुकानाला लागली. सुमारे दोन तास आग धुमसत होती. अग्निशामक दलाच्या तीन बंबाने आग विझवण्यात आली. नऊनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले.

Web Title: fire in Aurangabad

टॅग्स