मध्यवस्तीत आगडोंब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

औरंगाबाद - नवाबपुरा, मोंढा भागातील दाट मध्यवस्तीत उंच इमारतीच्या तळमजल्यातील फोमने पेट घेतल्याने मोठा आगडोंब उसळला. क्षणात आगीने इमारतीला व अन्य तीन घरांना वेढल्याने जीव धडधडत होते.

जिवाच्या आकांताने लोकांनी भराभर घरे रिकामी केली. अग्निशामक दलानेही गॅस सिलिंडर काढून बचावकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला.
नवाबपुऱ्यात मंगळवारी (ता. 13) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जिन्सीत रेक्‍झिनची कंपनी असलेल्या सय्यद अफरोजोद्दीन सय्यद कैसरोद्दीन यांची नवाबपुरा येथील मध्यवस्तीतील उंच इमारत आहे.

या इमारतीत चार ते पाच कुटुंबे भाड्याने राहतात. तर तळमजल्यात त्यांच्या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. याच तळमजल्यात मोठ्या प्रमाणात फोमचा साठाही ठेवण्यात आला होता. तळमजल्यातील गोडाऊनमध्ये अचानक आग लागली. क्षणात आगडोंब उसळल्याने मोठा धूर झाला. आग लागल्याचे समजताच नवाबपुऱ्यात भीतीचे वातावरण पसरले. एकच गोंधळ उडाला, आरडाओरड सुरू झाली.

जिवाच्या आकांताने लोक पळू लागले. दरम्यान, अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग वाढतच होती, मोंढ्यासह दूरवरून हवेत मोठा धूर दिसत होता. आगीचा विळखा वाढत असतानाच दुसरीकडे बघ्यांची गर्दीही वाढत गेली. आगीची माहिती कळताच महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दोन्ही पोलिस उपायुक्तांसह मोठा ताफा घटनास्थळी पोचला. दोन्ही बाजूने वाहतूक थांबवण्यात आली. आग विझविण्यासाठी जवानांचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले. सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले.

'अग्निशामक'ची कसरत
अतिक्रमण आणि छोटे कुचकामी रस्ते, यामुळे अग्निशामक दलाला नवाबपुऱ्यातील आगीच्या ठिकाणी पोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. लोकांची गर्दी, वाहतुकीची कोंडी यामुळे तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे अग्निशामक दलाच्या चालकाला बंब आत आणताच आले नव्हते. त्यामुळे बचावकार्य उशिराने सुरू झाले.

लोकांचा धावा
घटनास्थळी मोठा जमाव जमला. गल्ली व रस्ते खचाखच भरले. आगीची भीषणता व आलेले संकट पाहून लोकांच्या मनात भीती पसरलेली होती. मात्र, तरीही सुमारे दोनशे ते तीनशे जणांनी अग्निशामक दलाला मोलाची मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांनी आग आटोक्‍यात आली.

मदतकार्यात अडथळे
नवाबपुरा भागात छोट्या गल्ल्या असून या भागात रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. परिणामी मदतकार्यात तसेच पाण्याचे टॅंकर व बंब पोचण्यास विलंब झाला व आग वाढली. जर रस्ते सुयोग्य व अतिक्रमण निघाले असते तर आग पंधरा मिनिटांतच विझविता आली असती.

Web Title: fire in aurangabad