परळीत सहा दुकानांना आग लागून नुकसान

प्रवीण फुटके
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

परळी मार्केट परिसरातील स्टेशन रस्त्यावरील सरदारजी सायकल मार्ट जवळील सहा दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. 20) पहाटे ही घटना घडली. 
 

परळी (बीड) : येथील मार्केट परिसरातील स्टेशन रस्त्यावरील सरदारजी सायकल मार्ट जवळील सहा दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. 20) पहाटे ही घटना घडली. 

शहरातील मुख्य मार्केट परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास इलेक्ट्रीक दुकानात शॉर्ट सर्किट होवून मोठा स्फोट झाला व आगेचे लोळ बाहेर पडू लागले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने शेजारील पाच दुकानात ही आग पसरली. या आगीचा फटका सहा दुकानांना बसला असून मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Fire damage to six shops in parali beed