कचराग्नी सुरूच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहर कचऱ्यात सापडले असतानाच आता कचरा आगीत सापडला आहे. जिकडे तिकडे कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडत असून यातून वाहने, घरांनाही वेढल्याच्या काही घटना घडल्या आहेत. आता महापालिकेने आग लावणारांविरुद्ध भूमिका घेत तक्रारी दाखल केल्या. यात मंगळवारी (ता. २४) सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर व परिसरात कचऱ्याचा डोंगर साचला आहे. २० फेब्रुवारीपासून २९ मार्चदरम्यान येथील साचलेल्या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. पैठण येथील लकी ज्यूस सेंटर येथील कार पार्किंगमध्ये कचरा साचलेला असून येथे १३ मार्च ते पाच एप्रिलपर्यंत कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडले. तसेच सिल्लेखाना ते वीर सावरकर चौकादरम्यान तसेच नूतन कॉलनी मेडिकलजवळ समोरील बाजूला कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार २८ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान घडले. 

अभिनय टॉकीज, शिवाजी हायस्कूलजवळ खोकडपुरा, रविवार बाजार, गांधीनगर, सावजी हॉस्पिटलसमोर कचरा पेटवण्याचे प्रकार १३ मार्च ते आठ एप्रिलदरम्यान घडले. तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार, सावरकर चौक, शासकीय ग्रंथालयाजवळ, जिल्हा परिषदेचे मैदान येथे एक मार्च ते २२ एप्रिलदरम्यान कचऱ्याला आग लावली गेली. शांतिनिकेतन कॉलनी, विवेकानंद महाविद्यालय भागातही दोन एप्रिलला रात्री अकराला कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार घडला. या सर्व प्रकरणांत महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक दानिश सिद्दीकी, नासेर लईक यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: Fire to the garbage